महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदच्युत करा;राष्ट्रपतींना निवेदन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायमच वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत यापुर्वीही त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या बद्दल जाहीर कार्यक्रमात अवमान जनक वादग्रस्त विधान केले होते तेव्हाही महाराष्ट्रातील जनतेने याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली होती.
सध्या त्यांनी महाराष्ट्रातील ठाणे,मुंबई येथील राजस्थानी,गुजराथी यांना वजा केले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य करून मराठी माणसा बरोबरच महाराष्ट्रातील जनसामान्यांचा अपमान केला असून असे वारंवार जाणीवपुर्वक वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पदच्युत करण्यात यावे जेणेकरून भविष्यात सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. अशा मागणीचे निवेदन ईमेलद्वारे महामहीम राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांना केली आहे.
Comments
Post a Comment