निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक विभागाला निवेदन


पाटोदा (गणेश शेवाळे)महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत लोकसभा या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात कारण नुकतेच राष्ट्रपती पदासाठी लोकसभेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेण्यात आली आहे जर भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत असेल तर राज्यातील इतर निवडणुकाही बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. राष्ट्रपती पदाची मतदान प्रक्रिया सोडता इतर सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास का. या ईव्हीएमच्या विरोधात अनेक पक्ष संघटनांकडून ईव्हीएम मशीनच्या संदर्भात तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाकडे झाल्या आहेत तसेच शास्त्रज्ञांनी व राजकीय विश्लेषकांनी ईव्हीएम मशीन हॅक होत असल्या संदर्भात आपले मत मांडले आहे व तसे पुरावे देखील सादर केले आहेत या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र राज्यातील आगामी काळातील सर्व ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना पाटोदा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी गोरख झेंड, बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह पाटोदा वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी