वडवणीत शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर किसान सभेच्या वतीने चक्का जाम आदोलन



दोन तास किसान सभेचा वडवणी शहरात चक्काजाम आंदोलन

तालुक्यातील नागरिक युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

वडवणी (प्रतिनिधी):- मागील वर्षी ३ काळे कृषी कायदे वापस घेल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाला शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गन्हे मागे घेतले जातील व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले नाही म्हणून रविवारी ( ता ३१ )रोजी देशव्यापी विश्वास घात दिवस पाळुण वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.एमएसपी ची केवळ घोषणा नको . उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करा . केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला ? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा . शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात - निर्यात धोरण बदलून खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे करा . संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या . रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा . शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या . सर्व 
प्रलंबित पीक विम्याचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करा . यासह विविध मागण्सांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने रविवारी ( ता . ३१ ) सकाळी ११ वाजता वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात करण्यात आले होते.
या आदोलन केंद्र सरकार विरोधात कार्यकर्ते त्यानी जोरदार घोषबाजी करण्यात आली होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी