बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील रॅकेटसाठी एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्ह्य़ात गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असुन स्थानिक राजकीय पुढारी तसेच वरीष्ठ प्रशासकीय आधिकारी यांच्या पाठीराख्यामुळे मुख्य सुत्रधारापर्यंत जाणीवपुर्वक पोहचत नसल्यामुळेच तपास यंत्रणेबाबत बीड जिल्हावासियांमध्ये संशय असून यापुर्वीही मयत शितल गाडेकर प्रकरणात पोलीस तपासयंत्रणेतील आधिका-यांचे संशयास्पद निर्णय यासाठी कारणीभूत असुन या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ जुन रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "तपासयंत्रणेला सदबुद्धी द्या आंदोलन टाळ मृदंगाच्या गजरात करण्यात आले होते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन;मुख्य सुत्रधार शोधण्यासाठी एसआयटी अथवा सीआयडीमार्फत मार्फत तपास करा:-डाॅ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी बीड तालुक्यातील मौजे. बकरवाडी येथील मयत शितल गणेश गाडे अथवा परळी येथील गर्भपात प्रकरणात स्थानिक तपासयंत्रणेबाबत जनसामान्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबधित प्रकरणाची पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,गृहमंत्री,पोलीस महासंचालक तसेच अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य रूपालीताई चाकणकर तसेच अध्यक्ष मानवी हक्क आयोग यांना ईमेल द्वारे तक्रार केली संबधित प्रकरणात दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे.
Comments
Post a Comment