आमदार प्रकाश सोळंके थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे महसुल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

वडवणी प्रतिनिधी:

 तालुक्यातील कवडगाव बु.मंडळात परवा दुपारी ३वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृष्य पावसाला सुरुवात झाली तब्बल २तास झालेल्या धुव्वाधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला हा पाऊस कवडगाव मंडळातील २०गावच्या परिसरात २तास धुमाकुळ घालत होता या पावसाने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात हानी झालि आहे शेताला तळ्याचे स्वरुप तर नदीला महापुरआल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले.दरम्यान माजलगाव मतदारसंघाचे आ.प्रकाशदादा सोळंके यांनी तत्काळ दखल घेत या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला व महसुल प्रशासनाला तत्काळ पंचनामे करुन घेण्याचे आदेश देण्यात आले.
  या बाबत अधिक माहिती अशी कि यंदाच्या वर्षी वडवणी तालुक्यातील कवडगाव मंडळात गेल्या ७जुन पासुन सततधार पाऊस सुरु आहे शेतकर्यांनी कशीबशी खरीपाची पेरणी केली मात्र सततच्या पावसाने मशागत करता येत नसल्याने संपुर्ण पिके तणग्रस्त झाली आसुन सर्व शेती पडीक झाली आहे आणी अशातच परवा दि.३०रोजी या भागात दुपारी ३वाजेच्या सुमारास वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृष्य मुसळधार पावसाला सुरुवात झाली तब्बल२तास झालेल्या या राक्षसी पावसाने कवडगाव मंडळातील कवडगाव मोरेवाडी पिंपरखेड साळींबा देवडी खळवटलिमगाव काडिवडगाव देवगाव लवुळ खापरवाडी परडी माटेगाव धानोरा चिंचाळा ह.पिंप्री चिंचवडगाव चिंचोटी मामला पुसरा हिवरगव्हाण तिगाव कुप्पा बाबी कान्हापुर लक्ष्मीपुर आदी गावशिवारात धुमाकुळ घातला. या पावसामुळे या भागातील शेताला तळ्याचे स्वरुप आले होते तर नद्या नाले ओढे यांना महापुर आले होते नद्यानां आलेल्या महापुरांमुळे शेतात कामाले गेलेले शेतकरी शेतमजुर विशेषतः महिला रात्री ऊशीरापर्यंत नदीपलीकडे अडकुन पडले होते या पावसामुळे कवडगाव मंडळातील सर्व शिवारातील पिके वाहुन गेली आहेत तर सर्व नदिकाठची शेतीच वाहुन गेली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे महागडी बि-बियाणे खते औषधे यांचा केलेला खर्च पावसाबरोबरच वाहुन गेल्या शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
दरम्यान माजलगाव मतदार संघाचे आ.प्रकाशदादा सोळंके यांनी माहिती मिळताच तत्काळ नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या थेट बांधावर पहाणी दौरा केली यावेळी तहसीलदार मंडळअधिकारी त्या त्या गावचे तलाठी उपस्थित होते यावेळी आ. सोळंके यांनी उपस्थित महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी या नुकसानीचे पंचनामे करुन प्रशासनाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यावेळी आ. सोळंके यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट शासनाकडुन अनुदान मिळवुन देण्याची ग्वाही दिली.यावेळी आ.सोळंके यांच्या पाहणी दौर्यात वडवणी नगराध्यक्श शेषेराव बापु जगताप भारतदादा जगताप दिनेशराव मस्के महादेव अंभुरे जि.प.सदस्य औदुंबरकाका सावंत बजरंगआप्पा साबळे विश्वासराव आगे गंपुशेठ पवार संतोषदादा डावकर कारभारी वीर कवडगावचे उपसरपंच मकसुदखाँ पठाण देवगाव-खापरवाडीचे चेअरमन सचिनराव लंगडे पत्रकार शांतिनाथ जैन नवनाथ पडघन एम डि एल न्युजचे ओमप्रकाश साबळे सा. डोंगरचा राजाचे संपादक आनिल वाघमारे सतिष सोनवणे विनायकराव जाधव सुधाकर पोटभरे यांचेसह महसुल खात्यातील सर्व कर्मचारी तलाठी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

नितीन काळे यांचा तलावात बुडून मृत्यू!