माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
युवा नेते किशोर खोले यांचा राक्षसभुवन जि.प.शाळेत उपक्रम
पाटोदा (गणेश शेवाळे)माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील राक्षसभुवन येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.युवा नेते किशोर खोले यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे या भावनेतून किशोर खोले यांनी हा उपक्रम राबविला.या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस एम.एन.बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर,विवेक् पाखरे ,विठ्ठल वनवे,प्रकाश खेडकर, संकेत सानप, दत्तात्रयय तांबे,जितेंद्र खोले, संजय आघाव,बाळू सांगळे व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment