धारुर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चाचे साक्षीदार व्हावे-रामेश्वर गवळी

रासपचा दिल्लीत जंतर मंतरवर भव्य मोर्चा


बीड प्रतिनिधी, 

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्यावतीने दिल्लीत जंतरमंतरवर विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे धारूर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवळी यांनी केले आहे

याबाबत रासपा च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी 2022 रोजी जातिनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रीमी लेयर ची अट रद्द करणे, 50% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि खरेदीची हमी द्यावी, तसेच नागरिकांना शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे, इत्यादी मागणीचे निवेदन धारूर येथील तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी

धर्मराज मुंडे, शाहू कोळेकर ,बंटी कोळेकर, जनक तंबूड ,महेश बिट्टे, होनमाने दाजी ,आदी
 उपस्थित होते, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे धारूर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवळी म्हणाले आहेत की म्हणाले आहेत की, दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या भव्य मोर्चा मध्ये धारुर तालुक्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी