रासपचा दिल्लीत जंतर मंतरवर भव्य मोर्चा
कार्यकर्त्यांनी हाजारो च्या संख्येने उपस्थित राहावे, युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर
बीड प्रतिनिधी,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्यावतीने दिल्लीत जंतरमंतरवर विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा, अण्णासाहेब मतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे,
याबाबत रासपा च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट रोजी 2022 रोजी जातिनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रीमी लेयर ची अट रद्द करणे, 50% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि खरेदीची हमी द्यावी, तसेच नागरिकांना शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे, इत्यादी मागणीचे निवेदन बीड जिल्हा उपजिल्हाधिकारी संतोष राऊत सर यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी उपस्थित ,राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर सर, भगवान माने कर्मचारी जिल्हाध्यक्ष बीड, शिवाजी चांगण शहर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, बंडू कदम जिल्हा संघटक, कल्पेश भोंडवे पाटोदा तालुका युवक अध्यक्ष, सचिन ठेंगल, युवा नेते तुषार उंबरे, मस्के साहेब, चव्हाण साहेब, आधी व्यक्ती उपस्थित होते,
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर म्हणाले आहेत की, दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या भव्य मोर्चा मध्ये बीड जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे,
Comments
Post a Comment