ताडसोन्ना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार गोरख बाबर
बीड प्रतिनिधी
बीड तालुक्यातील नबापूर व बोरदेवी येथील रहिवासी, गोरख बाबर ,सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व ,हे नाव गेले अनेक दिवस सामाजिक क्षेत्रात ऐकाला भेटल आहे, एक छोट्याशा गावातून अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले व्यक्तिमत्व घरात कुठला राजकीय वारसा नसताना, आज राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाची माळ त्याच्या गळ्यात आहे, गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत ,बीड तालुक्यात जनसेवेसाठी कटिबद्ध आहे ,सामाजिक कार्यातून लोकांची कामे केली ,कुठला दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो, खरे तर या युवकांनी सामाजिक बांधिलकीतून खूप वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,परिसरात वृक्षारोपण विविध ,सामाजिक कार्याची जाण असणारा अवलीया, परिसरातील सर्वसामान्य सोबत जाणारे व्यक्तिमत्व गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे .
ताडसोन्ना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष गोरख बाबर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment