बैलगाडी तळ्यात पडुन कारेगव्हाण येथील ऊसतोड मजुराच्या बैलाचा मृत्यू
बीड प्रतिनिधी,:-बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथे काल सकाळी ९:३० च्या दरम्यान बैलगाडी घेऊन शेतात जात असताना अचानक बैलाचा पाय घसरून बैलगाडी तळ्यात पडुन बैलाचा जागीच मृत्यू झाला बीड तालुक्यातील कारेगव्हाण हे गाव ऊसतोड मजुरांचे गाव म्हणुन परिचित आहे येथे डोंगराळ भाग असल्याने येथील ग्रामस्थांना आपली उपजीविका भागविण्यासाठी ऊसतोडणी साठी जावे लागते याच गावातील गहिनीनाथ प्रभु खंदारे हे काल सकाळी ९:३० वाजता आपल्या शेतात वैरण आणण्यासाठी जात असताना अचानक बैलाचा पाय घसरून बैलगाडी तळ्यात पडली व बैलाचा जागीच मृत्यू झाला एक तर परिस्थिती अतिशय बिकट असताना हे येवढं मोठ संकट या ऊसतोड मजुरावर आले आहे महसुल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करण्यात आला या ऊसतोड मजुरांचे अतोनात नुकसान झाले असून शासन स्तरावर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या मध्ये प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शासन स्तरावर मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भैय्या खंदारे यांनी प्रशासनाकडे केली आहे
Comments
Post a Comment