१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती — पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार; डॉ. गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा
१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती — पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार; डॉ. गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा बीड – प्रतिनिधी(दि.०१ ) तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून, प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते, त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बसस्थानकात उभे राहावे लागले. जून २०२५ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे; शौचालय बांधले असले तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच बसस्थानक परिसरात पथदिवे बंद असुन योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचेप्रकार आढळून आले आहेत. गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत. संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत अ...