भ्रष्टयंत्रणेमुळे पाटोदा पंचायत समितीत वर्षात तीन अधिकारी बदलून गेले नवीन आलेले बीडीओ सानप साहेबांसमोर भ्रष्टाचारावर लगाम लावणे,शिस्त व पारदर्शकतेचं मोठं आव्हान


पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील पंचायत समितीत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनातील भ्रष्टाचार, कामचुकारपणा आणि गैरव्यवहारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भ्रष्ट यंत्रणेला वैतागून मागील एका वर्षात तब्बल तीन बीडीओ बदलून गेले, परंतु स्थिती पूर्वीप्रमाणेच कायम आहे. अशा पार्श्वभूमीवर नुकतेच कार्यभार स्वीकारलेले नवीन बीडीओ सानप साहेब यांच्याकडून आता सर्वसामान्य जनतेत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शासकीय वेळेत अनेक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात, तर काहीजण आपली कामे करण्यासाठी अनावश्यक विलंब करतात. विशेषतः इंजिनियर विभागात “दामाशिवाय काम नाही” अशी प्रथा जणू सर्वमान्य झाली आहे. ग्रामविकासाच्या योजनांपासून ते रस्त्यांच्या कामांपर्यंत सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराचे सावट असल्याचे चित्र दिसून येते.अनेक वेळा नागरिकांनी पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता लोकांच्या नजरा नवीन बीडीओ सानप साहेबांकडे वळल्या आहेत. त्यांच्याकडून कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, भ्रष्ट यंत्रणेला लगाम घालणे आणि पारदर्शक प्रशासन उभे करणे याची अपेक्षा आहे.स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, “दरवर्षी अधिकारी बदलतात पण परिस्थिती बदलत नाही. आता सानप साहेबांनी जर खरंच कठोर पावले उचलली, तर प्रशासनावर जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल.”पाटोदा पंचायत समिती ही तालुक्याच्या विकासाचे केंद्र असून, जर इथल्या यंत्रणेत पारदर्शकता आली, तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाला गती मिळू शकेल. सानप साहेबांसमोर भ्रष्टाचारमुक्त,जबाबदार आणि शिस्तबद्ध पंचायत समिती उभारण्याचं मोठं आव्हान आहे. पुढील काही आठवड्यांत त्यांच्या कारवाईवरूनच हे स्पष्ट होईल की, या बदलाची नवी सुरुवात खरोखर होते की पुन्हा एकदा फक्त अधिकारी बदलून परिस्थिती जसंच्या तसं राहणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी