आम आदमी पार्टीची बीडमध्ये विशेष बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवार चाचपणी

आम आदमी पार्टीची बीडमध्ये विशेष बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवार चाचपणी

माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड 

बीड (प्रतिनिधी) – येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीची उद्या शनिवार रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे राज्यसचिव माननीय संग्राम जी घाडगे पाटील व प्राध्यापक वैजनाथजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येत आहे या बैठकीमध्ये आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक मा. अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री दिल्ली राज्य यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन पक्षात सक्रियपणे काम करण्याची इच्छा असणारे तसेच निवडणुकीत उमेदवारी इच्छुक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी केले आहे.
बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून उमेदवारीसाठी अर्ज (फॉर्म) भरून घेतले जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीकडून उमेदवारी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी ही बैठक चुकवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही विशेष बैठक शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी, शासकीय विश्रामगृह, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी