संशयास्पद रित्या मृत पावलेली डॉ.संपदा मुंडे यांना मरणोपरांत न्याय मिळावा
संशयास्पद रित्या  मृत पावलेली डॉ.संपदा मुंडे यांना  मरणोपरांत  न्याय मिळावा
एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यात  व राज्यात  महिलां-मुली-बालिकांवरील अत्याचाराच्या अनेक  घटना नित्याने घडत आहेत ,याकडे  शासन -प्रशासन जबाबदारीने गंभीर नाही. महिलांना सर्व ठिकाणी सुरक्षितता असणे,यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ,परंतु डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्या (की हत्या) करायला भाग पडणारी यंत्रणा- जी पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी व राजकिय लोकांच्या दबावामुळे संपदाच्या झालेल्या हत्या याची गंभीरतेने दखल घेणे व सध्या समाजात आरोपींची वाढलेली गुंडप्रवृत्ती दिसते. या घटनेचा निषेध व्यक्त करत 'एकल महिला संघटना' च्या वतीने  बीडच्या लेकीला- डॉ संपदाला  मृत्युत्तोर तरी न्याय मिळावा; यासाठी खालील मागण्या करण्यात आल्या...
राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था रसातळाला गेली असून फलटण येथील जाहीर कार्यक्रमात  मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी खा.निंबाळकर याना क्लीनचिट दिल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
पीडित कुटूंबाला न्याय मिळावा, यासाठी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी समिती नेमावी.
पोलीस-आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी- गुन्हेगारांंना व डॉ  संपदाच्या तक्रारीची वेळीच दखल न घेवून, जबाबदारी टाळणा-या दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिका-यांना कठोर शिक्षा व्हावी. 
डॉ संपदा मुंडेने दिलेल्या लेखी तक्रारींमध्ये नमूद केलेल्या पी.ए. व खासदारांविरुद्ध  गुन्हे नोंद व्हावेत. न्यायालयीन निष्पक्ष चौकशी व्हावी.
ग्रामीण आरोग्य सेवेत कार्यरत महिला डॉ आणि आरोग्य सेविकासाठी सर्व ठिकाणी सुरक्षित निवास, लैंगिक छळ प्रतिबंधक यंत्रणा, आणि तक्रार निवारण समित्या तातडीने कार्यान्वित कराव्यात.
महाराष्ट्र राज्यात सर्व सरकारी रुग्णालयामध्ये महिला सुरक्षा धोरण लागू करावे.
या मागण्या करण्यात आल्या आहेत .
यावेळी 'एकल महिला संघटनेच्या' शिल्पा पंडित, रुक्मिणी नागापुरे,  रेखा खंडागळे, साक्षीताई, पूजा वजीर, समीक्षा वाघमारे, अनिता खंडागळे उपस्थित होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाये, शाम मार्कंडे, डी.जी.तांदळे सर, डॉ.संजय तांदळे सर, अनिल कचरे हे देखील सहभागी होते.
Comments
Post a Comment