पाटोदा पत्रकार अध्यक्ष अजय जोशी यांनी आर.डी.सी. शिवकुमार स्वामी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या केवायसी व अनुदान विषयावर चर्चा
पाटोदा (प्रतिनिधी) : पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष अजय जोशी यांनी आर.डी.सी. शिवकुमार स्वामी साहेब यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीत पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केवायसी संदर्भातील अडचणी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय अनुदानासंबंधी विषय तसेच तालुक्यातील इतर शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.अजय जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, तसेच सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी केली. स्वामी साहेबांनी योग्य ती दखल घेत शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment