कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदर निमित्त आले एकत्र

कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदर निमित्त आले एकत्र
 
सोमनाथ विद्यालय येथील विद्यार्थी यांनी घेतली उच्च स्तरावर उंच भरारी
परळी प्रतिनिधी-
परळी तालुक्यातील मौजे कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आले होते. यावेळेस शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणात आला होता,
इयत्ता 10 मधून शाळा सोडल्यानंतर काही जण तालुक्यात तर बाहेर जिल्ह्यात शीक्षणासाठी गेले होते यामध्ये बरेच जण उच्च अश्या सरकारी नोकरी मध्ये लागले तर काही जण प्रायवेट जॉब करू लागले होते.वर्गमित्रापैकी बरेच जण आज डॉक्टर, शिक्षक, पोलीस, भारतीय सैन्य दलात जवान, व्यापारी, उधोजक,पत्रकार,लोको पायलट, अश्या अनेक पदावर कार्यरत असून यावेळी सर्वांचा सन्मान करण्यात आला.
या धावपळीच्या युगात वेळ नसल्यामुळे एकमेकांची भेट घेणे तसे शक्य नव्हते, परंतु सोशल मीडिया असल्यामुळे वर्गमित्र बळीराम तिडके याने सर्व वर्गमित्र एकत्र ग्रुप करून जोडले त्यामुळे काही प्रमाणात बरेच मित्र जोडले गेले आणि आज त्यानिमित्ताने गेट टुगेदर साजरा करून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.
यापुढे ही असेच मिळून नवीन उपक्रम राबवून होतकरू,कष्टकरी, गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून निसर्ग प्रेमी या नात्याने वृक्ष लागवड करण्यात आली होती,यावेळी सर्वांनी संवाद साधून उपस्थित असलेल्या सर्व मित्रांनी एकमेकांना पुन्हा असेच भेटू म्हणून आशा वेक्त केली आणि आठवन म्हणून ग्रुप फोटो काढून निरोप घेण्यात आला यावेळी उपस्थित म्हणून
संजय गवळी, अजय मुंडे, गोपाळ फड, बिभीषण मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे, चंद्रकांत काळे, बळीराम तिडके, ईश्वर बहिरे, संभाजी बहिरे, शंकर फड, नितीन फड, देवानंद आलट,अक्षय मुंडे पाटील, महादेव फड, सुरेश फड,रवी घाटे, गोरख कंडूकटले,नितीन खाडे, माधव डापकर,भागवत डापकर, समाधान बहिरे, गोविंद कोकाटे, पवन फड, बाळासाहेब फड, भगवान फड,नामदेव बहिरे, रायचंद फड, गणेश रोडे, आनंद गवळी, गोविंद फड,मोहन भास्कर,सोमनाथ मुंडे,वैजनाथ मुंडे, सुनील मुंडे,नितीन रोडे,सोमनाथ काळे,सोमनाथ हाणवते इत्यादी हजर होते..

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी