बीड नगरपरिषद निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेस कार्यालयात अर्ज करावेत- परवेज कुरेशी



बीड प्रतिनिधी - काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव दादा पाटील, आदित्य दादा पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या आदेश व सूचनेवरून बीड नगरपरिषद निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेस कार्यालयात अर्ज करावेत असे परवेज कुरेशी यांनी पत्रकार द्वारे कळवले आहे.

 बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता शहरातील नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात उमेदवारी करिता अर्ज करावेत.

नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी १ नोव्हेंबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या कार्यकालात अर्ज घ्यावेत. उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्ष शहर कार्यालय,फिनिक्स हॉस्पिटल जवळ जालना रोड बीड येथे करावे.कार्यकालात अर्ज घेऊन पुन्हा तो परवेज कुरेशी शहराध्यक्षयांच्याकडे जमा करावयाचा आहे. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत अर्ज घेऊन जमा करावयाचा आहे,त्या सोबत प्रभागातील जाती जनगणना आवश्यक आहे. नगरसेवक, नगरसेविका किंवा नगराध्यक्ष पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज हा पक्ष कार्यालयातूनच घेऊन जाने बंधनकारक आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी