डाॅ.संपदा मुंडे यांच्या हत्येचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने तीव्र निषेध
डाॅ.संपदा मुंडे यांच्या हत्येचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने तीव्र निषेध....
प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा व पाच कोटी कुटुंबाला आर्थिक मदत द्या नितीन जायभाये
खाकीतील सैतानांनी "सावित्रीबाई फुले" यांच्या लेकीला छळ करून अशा पद्धतीने संपवून महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासली...
शाहू, फुले,आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात प्रशासनातून व खाकीतूनच सैतान जन्माला येतोय...
बीड शहर बचाव मंचाच्या वतीने डॉ. संपदा मुंडे यांना आदरांजली व आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात येत असून खाकीतील सैतान व त्यांच्यासोबत असणारे सर्व अधिकारी यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज हा निषेध नोंदवण्यासाठी भाषेच्या कोषात शब्द कमी पडत आहेत.डाॅ.संपदा मुंडे या गरीब घरातल्या एक शेतकरी कन्या होत्या. आई-वडिलांनी कर्जे काढून काढून मुलीचे शिक्षण पूर्ण केलं होतं.मुलगी उच्च शिक्षित झाली होती. नुकतीच कुठं त्याची चिमुकल्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. आपल्या शेतकरी आई वडिलांसाठी डोळ्यात हजारो स्वप्न होते.आपल्या गरीब शेतकरी कुटुंबाचे कर्ज फिटणार होते. या उच्च शिक्षित डॉक्टर कन्येच्या रूपाने या गरीब शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नांना पंख मिळणार होते. आता कुठ या महाराष्ट्राच्या लेकीसाठी एक समृद्ध आयुष्य समोर हात जोडून उभा ठाकून स्वागत करत होतं. अशातच पोलिसी खाकीतील, प्रशासनातील अधिकारी व यात नंतर सहभागी झालेले लोकप्रतिनिधीच्या वेशातील सैतान यांची वाईट नजर तिच्यावर पडली. तिच्यावर मानसिक दबाव आणत तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू झाला. या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासण्याचा काळा अध्याय सुरू झाला. आणि रक्षकच बनला भक्षक.
या प्रकरणात असलेले खासदार, आमदार व त्याचे पी.ए.राजकीय नेते यांची देखील कसून तपासणी करून त्यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करावे अशी मागणी बीड शहर बचाव मंचच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणावर बीड जिल्ह्यात व महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नितीन जायभाय यांनी पत्रकातून सांगितले आहे.
Comments
Post a Comment