शिरूर पोलिस स्टेशनच्या हाद्दीतील जाटवड या गावांमध्ये एका वृध्द व्यक्तीला व त्याच्या कुटूंबीयाला जीव मारण्याचा प्रयत्न
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
भर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला थरारक शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साहेब आपण या वृध्द बाबाला व त्यांच्या मुलीला व कुटूंबीयांना न्याय देणार का ?
शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाव जाटवड मानुर तालुका शिरूर कासार या गावांमध्ये भर दिवाळी भाऊबीजच्या दिवशी भाऊकीतील लोकांनी भगिनाथ पाटीलबा पाखरे . अंबादास भागिनाथ पाखरे . शोभाबाई भागिनाथ पाखरे . शिवनाथ भागिनाथ पाखरे . या त्यांच्या भावकीतील लोकांनी मिळून एका वृद्ध बाबाला व त्यांच्या अहिल्यानगर येथील वैशाली बडे या लेकीला व त्यांच्या मुलगा लक्ष्मण पारखे व त्यांच्या पत्नीला व सुनेला या सर्व मंडळीला या आरोपीने हातात लाट्या . काठ्या . कुराडी घेऊन असे मोठे मोठे शस्त्र घेऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला . स्वतःच्या वडिलांना मारू नका असे म्हणताना त्यांच्या लेकीचा वैशालीताई बडे यांचा या आरोपींकडून विनयभंगाचा प्रकार देखील घडल्याचे समोर आले आहे . हा थरारक प्रकार भर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला यामुळे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था थोडी तरी शिल्लक आहे का ? नाही हाच प्रश्न आता नागरिकांना पडला आहे . सध्या पारखे कुटुंब भयभीत झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत . या कडे शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब हे लक्ष देतील का? नाही म्हणू आता असा प्रश्न पडला आहे की शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब या वृद्ध बाबाला व त्यांच्या लेकीला . व त्यांच्या सुनेला व त्यांच्या मुलीला न्याय मिळवून देतील का? हाणामाऱ्या करणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या अशा आरोपीवर कडक कायदेशीर कार्यवाही करतील का? त्यांना लगेचच सोडून देतील का? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे . म्हणून या आरोपीवर तात्काळ कडक कार्यवाही करण्यात यावी . नसता पारखे कुटूंबीय जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कावंत साहेब यांची भेट घेऊन त्यांना न्याय मागणार असल्याचेही बोलले जात आहे . आता या महत्वाच्या गंभीर बाबीवर शिरूर कासारचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब कशाप्रकारे हे प्रकरण हाताळून पारखे बाबांना व त्यांच्या अहिल्यानगर यंथील असलेल्या वैशालीताई या लेकीला व त्यांचा मुलगा लक्ष्मण भैय्या यांना व त्यांच्या मातोश्रीला न्याय मिळवून देतील का ? हे पाहणे येणाऱ्या काळामध्ये गरजेचे आहे
Comments
Post a Comment