लोकजनशक्ती पार्टी (र) च्या वतीने गायरान हक्क परिषद तथा कार्यकर्ता मेळावा उत्सवात संपन्न
लोकजनशक्ती पार्टी (र) च्या वतीने गायरान हक्क परिषद  तथा कार्यकर्ता मेळावा उत्सवात संपन्न.........
             धाराशिव जिल्ह्यात तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी,रविवार लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)यांच्या वतीने  धाराशिव जिल्हा वतीने विभागीय, गायरान हक्क  परिषद घेण्यात आली. या परिषदेला मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर विचार मंथन करण्यात आले. पार्टीचा अजेंडा,विचार,ध्येयधोरणे, सभासद नोंदणी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातून विचार  आणि आदरणीय रामविलास पासवान साहेब यांच्या केलेल्या कार्याची माहिती देत,असतानाच सध्याचे लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांनी केलेल्या कार्यासंबंधी माहिती देण्यात आली.बिहारमध्ये होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी विषयी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना महाराष्ट्राच्या लोक जनशक्ती पाठीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या  तसेच बिहार मध्ये निश्चितच पार्टी बहुसंख्य उमेदवारांना निवडून आणेल आणि बिहारच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पार्टीचा विजय निश्चित आहे.पार्टी बिहारमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल याविषयी कुठलीही शंका नाही.
             गावरान हक्क परिषदे मध्ये काही ठराव घेण्यात आले,ठरावाचे वाचन झाल्यानंतर सर्वानुमते  ठरावाला संमती मिळाली.
        ठराव पुढीलप्रमाणे आहेत.
1.गावरान जमिनी या सरकारने विकसित करण्यासाठी ज्यांच्या नावावर गावरान जमिनी आहे त्यांना प्रोत्साहनात्मक मदत देऊन त्या जमिनी विकसित करण्यासाठी आर्थिक मदत करावी, 
2.सरकारने गायरान जमिनी ताब्यात घेतल्या असतील तर त्या ज्यांच्या नावावर होत्या त्यांना परत करावे.
3.जमिनीचा विकास करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी.
4. गायरान जमिनी प्रमाणेच महार वतन जमिनी सुद्धा सबंध राज्यात असून त्या जमिनी कसल्या गेल्या नाहीत म्हणून सरकारने वेगवेगळ्या खात्याकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला आहे,जसे की सार्वजनिक क्षेत्रासाठी,जंगल क्षेत्रासाठी फॉरेस्ट लँड म्हणून वर्ग करण्यात आलेल्या आहेत. त्या जमिनी ज्यांच्या नावावर होत्या त्यांना परत करून त्या जमिनीचा विकास करण्यासाठी आणि शेती योग्य जमीन करण्यासाठी एकरी 50 हजार रुपये शेती विकासासाठी द्यावे.
5.महार वतन जमिनी, इनामी जमिनी आणि गायरान जमीन यावर अतिक्रमणे झालेले आहेत ते तात्काळ दूर करावे आणि ज्यांच्या आहे त्यांना त्या परत करावे आणि त्याचा विकास करावा.
6.वतनी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आडनावा ऐवजी व्यक्तीच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्या दुरुस्त करून जातीच्या ऐवजी आडनावाचा सातबारा वर उल्लेख करावा.
7. गायरान जमिनी विकसित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवून महाराष्ट्रामध्ये या जमिनीची फेर नोंदणी करावी आणि त्या विकसित करण्यासाठी संबंधितांना मदत करावी.
8.शेती हा ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील रोजगार उपलब्ध करून देणारा भाग असल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष न करता शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतीचा विकास हाच कुटुंबाचा आधार आहे,त्यामुळे शेतीला पाण्याची, खताचे, पिकाची, औषधाची फवारणीची आणि लागणाऱ्या सर्व यंत्रणेची सोय कशी होईल याचा विचार करून शेतीला मार्केट व्हॅल्यू म्हणून पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात राज्यावरील आर्थिक ताण कमी होऊ शकेल कारण हीच नोकरी आहे असे शेतकऱ्यांच्या प्रगती बरोबरच शेतीची प्रगती होऊ शकेल तेव्हा शेतीला प्रगतीचा दर्जा देऊन शेतीचा विकास करावा.
Comments
Post a Comment