धस आण्णा जात,पात,धर्म विसरून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अंगद सांगळेंना मोठी जबाबदारी देऊन न्याय द्यावा कार्यकर्त्यांची मागणी
पाटोदा (प्रतिनिधी ) आमदार सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणारे अंगद सांगळे हे कार्यकर्ते जिल्ह्यात ओळखले जातात. समाजातील जात, पात, धर्म या भिंती ओलांडून त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी निस्वार्थपणे काम केले आहे. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मते, सांगळे यांनी पक्षनिष्ठा आणि जनसेवा यांचा उत्तम समन्वय साधत नेहमीच विकासात्मक कामांमध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, मदत कार्य, तसेच युवकांच्या संघटनांमधून जनतेचा विश्वास जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून आता मागणी होत आहे की, अशा निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आण्णाने मोठी जबाबदारी देऊन न्याय द्यावा. “अंगद सांगळे यांसारखे कार्यकर्ते हेच आमदार सुरेश आण्णा धस यांची खरी ताकद आहेत,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.हळूहळू ही मागणी जोर धरू लागली असून आण्णाने याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment