डॉ. संपदा मुंडेंची आत्महत्या नाही तर हत्याच; गुन्हेगारांना मरे पर्यंत फाशी द्या
डॉ. संपदा मुंडेंची आत्महत्या नाही तर हत्याच; गुन्हेगारांना मरे पर्यंत फाशी द्या!
विविध सामाजिक, शासकीय संघटना, सोमवारी कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा!
बीड (प्रतिनिधी ) : पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी व राजकीय दबावामुळे बीड जिल्ह्य़ाची कन्या डॉ. संपदा मुंडे हिने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे. डॉक्टर संपदाच्या खूनास जबाबदार पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी व दबाव आणणारे खासदार व राजकीय पदाधिकाऱ्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी यासाठी बीड शहरातील विविध सामाजिक संघटना कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्य़ाची भूमिकन्या, शेतकरी कन्या डॉक्टर संपदा मुंडे ही फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या जाचाला कंटाळून तीने आत्महत्या केली. त्यामुळे राज्यात संतापाची लाट ऊसळली असून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारांना फाशी द्यावी या मुख्य मागणीसह आदी मागण्यासाठी बीड शहरातील विविध सामाजिक संघटना छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायं 6.00 वा कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा काढणार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पार रसातळाला गेली असून यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासह अनेक मंत्रीपदाचा कार्यभार असल्यामुळे ते गृहमंत्रालयास न्याय देवू शकत नसल्याने राज्यात खून, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार वाढले असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. सदरील कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शासकीय कर्मचारी संघटना, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भा.क.प.,मा.क.प., शे.का.प., आम आदमी पार्टी, काँग्रेस,ईंटक संघटना ,राष्ट्रवादी शरद पवार गट, भगवा धारी प्रतिष्ठान, मातृभूमी प्रतिष्ठान, एकल महिला संघटना, लेक लाडकी अभियान, बीड शहर बचाव मंच, शिव क्रांती युवक प्रतिष्ठान, माहिती अधिकारी महासंघ आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान शिवशक्ती भीमशक्ती संघटना मराठवाडा शिक्षक संघ,महिला फेडरेशन, अंनिस, हमाल मापाडी संघटना, अन्याय- अत्याचार -भ्रष्टाचार निर्मूलन समिती ,मेडिकल ऑफिसर संघटना, मॅग्मा संघटना, नॅचरोपॅथी असोसिएशन, आयुर्वेदिक असोसिएशन आदी संघटना, नागरीक, सहभागी होणार असून सर्वांनी मोर्चा व कँडल मार्च मध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन विविध संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment