शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषद आली धावून
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मल आयडी व केवायसी प्रक्रियेमुळे अनुदान मिळण्यात अडथळे येत असल्याने पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तहसीलदार साहेबांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ वेळेवर मिळावेत, यासाठी केवायसी व फार्मल आयडी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. तहसीलदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव तसेच पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment