"वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाला 15 ग्रंथाचे दान,आयु. माया दिवाण-सोनवणे यांच्या कडून दान पारमीतिचे पालन
( लेख)
"वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाला 15 ग्रंथाचे दान,आयु. माया दिवाण-सोनवणे  यांच्या कडून दान पारमीतिचे पालन 
 तथागतांनी उपदेशीलेला पंचशील,अष्टांगिक मार्ग व दहा पारमिते नुसार जीवनात आचरण केल्यास माणूस दुःख मुक्तीच्या मार्गाने जातो हे समजून घेण्याकरता वाचन,पूज्य भिक्खूंच्या देसना समजून घेणे हा मार्ग आहे. लहानपणापासूनच मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून सतत प्रयत्नशील असलेल्या व त्या उद्देशानेच वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाचे 40 केंद्र स्थापन करणाऱ्या आयु.डी.जी वानखेडे बाबा यांच्या मित्र नगर मधील मोफत वाचनालयाला "रमाई" चरित्र ग्रंथ; लेखिका आयु माया दिवाण- सोनवणे तर्फे 15 ग्रंथ वाचनालयाला दिले.त्यांचा उपयोग मुलांना,पालकांना वाचण्याकरिता वाचनालयातर्फे करण्यात येणार आहे. वाचनालयांनी 2016 पासून आतापर्यंत 40 केंद्र शहरातील व बीड परिसरातील तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात स्थापन करून त्यामध्ये 3000 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे. या वाचनालयाचे समाजउपयोगी कार्य बघून आतापर्यंत प्रो.डॉ. उपप्राचार्य उत्तमराव साळवे, प्रो. डॉ. मनोहर सिरसाट,शिक्षण अधिकारीसखाराम उजगरे, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे,सत्यशोधक परिषदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भाऊ उपरे, तसेच महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले व सत्यशोधक परिषदेचे राज्य संघटक आयुष्यमान अमरसिंह ढाका, समाजसेवक प्रशांजी वासनिक यांनी प्रत्येकी 1000 रुपयांची पुस्तके आपल्या  वाचनालयाला भेट दिलेली आहेत. तसेच आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ आयु. ॲड राहुल मस्के,वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ  ॲड तेजस वडमारे व आई आणि भावाच्या स्मृती प्रित्यर्थ इंजि. कांचन गायकवाड यांनी प्रत्येकी 12 बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ वाचनालयाला धम्मदान दिलेले आहेत.
 वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन, संवाद व बौद्धिक प्रबोधन आवश्यक आहे हे लक्षात ठेवून विद्यार्थी, पालकाकरता अनेक कार्यक्रम संपन्न करून विद्यार्थी सुसंस्कृत कसे होतील व स्पर्धा परीक्षेकरता कसे प्रवृत्त होतील याकरता महामानव अभिवादन  ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले सर व सर्व सदस्यांचे बहुमूल्य सहकार्यातून 4 मोफत शिकवणी वर्ग चालवून वंचित व गरजू विद्यार्थ्यांना महागड्या शिकवणी वर्गाच्या बरोबरीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. व ह्या कार्यास देखील समाजातून भरघोस सहाय्य मिळत आहे.
 रमाईच्या जीवन चरित्राबद्दल आपल्या प्रस्ताविकेत प्रो
. डॉ. मनोहर सीरसाठ लिहितात कि रमाई आंबेडकर यांचे जीवन एक दीपस्तंभ आहे जो बाबासाहेबांच्या कार्यात प्रकाश टाकतो. रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे शक्ती,रमाई म्हणजे त्या युगपुरुषांच्या अस्तित्वाची आधारशीला!अशा त्यागमूर्ती माता रमाईचे जीवन चरित्र प्रत्येकाने वाचून त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर व विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याकरता हे वाचनालय प्रत्येक केंद्रात किमान 2 पुस्तकांच्या प्रति वाचण्याकरता ठेवण्यास कटिबद्ध आहे असे वाचनालयातर्फे आश्वासन देण्यात आले. सर्व पुस्तक दान दात्याचे वाचनालय तर्फे आभार व्यक्त केले.वाचनालय केवळ दानच स्वीकारत नाही तर श्रामणेर शिबिरार्थी मोफत शिकवनी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना, वार्षिक परीक्षेतील सर्व थरातील गुणवंत विद्यार्थ्यांना, शालेय साहित्य कंसात (वही,पेन,कंपास व रायटिंग पॅड) व महापुरुषांचे जीवन चरित्र पुस्तके तसेच त्रिशरण पंचशील हाच जीवन मार्ग पुस्तके देऊन जेष्ठ महिला व जेष्ठ नागरिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता यथोचित सत्कार करण्यात येतात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता वाचनालय व महामानव अभिवादन ग्रुप सदैव तयार असतो. याकरता शहरातील मान्यवर प्राध्यापक, डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी शिक्षण तज्ञांची व्याख्याने आयोजित करूनमुलांचे व पालकांचे प्रबोधन केल्या जाते यातून विध्यार्थी स्पर्धा परीक्षे करिता प्रयत्नशील राहतात.
शब्दांकन :-ॲड तेजस वडमारे,
मोबाईल नंबर 9922536753
Comments
Post a Comment