चौसाळा जिल्हा परिषद गटात लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या नावाची चर्चा



(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गटात लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन चौसाळा जिल्हा परिषद निवडणुक लढवावी म्हणून गावोगावी वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यामध्ये जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे चौसाळा सर्कलचा प्रलंबित विकास करण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार असल्याची चर्चा दिसत आहे गोरगरीब लोकाना सढळ हाताने मदत करणारे प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुखात सामील होणारे समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग असलेले लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या पाठिशी सर्वसामान्य जनतेची मोठी ताकत असुन अनेक गावातील विकासकामे मार्गी लावलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक कार्यामुळे आणी सर्वसमावेशक व्यक्तिमत्वामुळे लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांना चौसाळा जिल्हा परिषद गटात मतदारांची पसंती मिळत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे त्यांच्याकडे युवकांची लोकप्रियता कायम असल्याने त्यांनी चौसाळा जिल्हा परिषदेची निवडणुक लढवावी अशी मागणी सर्वसामान्य मतदारातुन होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी