आष्टी तालुक्यातील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना तात्काळ पुनस्थापित करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ३१ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
                 आष्टी तालुक्यातील कामधेनू म्हणून ओळख असलेल्या कारखाना येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळांनी कर्ज भरून पुन्हा कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करून कारखान्याचे यंदा धुराडे पेटवण्याच्या दृष्टीने वेगाने कामकाज सुरू केले. मात्र राज्य/ केंद्र सरकारने परवाना रद्द केल्याने परवाना पुनस्थापित करण्याच्या मागणीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकरी, उत्पादक शेतकरी, सभासद ,संचालक मंडळ यांचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३१  ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी/ पोलीस अधीक्षक यांच्याकडे २७  ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात दिला.
  निवेदनात पुढे सांगितले की, महेश सहकारी साखर कारखाना बीड /अहिल्यानगर /धाराशिव /७  तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वर्ग या कारखान्यावर अवलंबून असून मोठ्या प्रमाणावर दुष्काळी आष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार होता . अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार होते, परंतु राज्य /केंद्र शासनाने कारखान्याचा परवाना रद्द केला . कारखान्यावरती असलेले बँकेचे कर्ज माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने निल करून यंदा कारखान्याचे धुराडे पेटवण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरू केले होते, परंतु सरकारने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून कारखाना कार्यरत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून इतर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असून आमच्या कारखान्याचे सर्व काम ठप्प झाल्याने या पार्श्वभूमीवर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, शेतकरी ३१  ऑक्टोबर २०२५ शुक्रवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे .
Comments
Post a Comment