पाटोदा डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्यावतीने डॉ. संपदा मुंडे घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
पाटोदा (प्रतिनिधी) फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा तीव्र निषेध पाटोदा तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्यावतीने करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा अमानवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.या संदर्भात डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटोदा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना प्रमुख उपस्थितीत डॉक्टर, शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.या वेळी वक्त्यांनी म्हटले की, “महिला डॉक्टरवर झालेली ही घटना अत्यंत संतापजनक असून संपूर्ण वैद्यकीय व सामाजिक क्षेत्र या घटनेने हादरले आहे. शासनाने आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी.”या निषेध आंदोलनात पाटोदा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी डॉक्टर,व किसान सभेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment