Posts

Showing posts from July, 2024

आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे बीड विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा

Image
आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे बीड विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा मा. संग्राम गाडगे पाटील संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील येणाऱ्या 288 विधानसभा आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे यानिमित्त 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे संघटन मंत्री माननीय संग्राम घाडगे पाटील हे आले असता बीड जिल्ह्यातील सहा चे सहा विधानसभेची चाचपणी बैठक घेऊन येथील कार्यकर्त्यांच्या भावना व पार्टीचे काम पाहता बीड विधानसभेची उमेदवारी माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड यांचे नाव सर्व सहमतीने जाहीर करण्यात आले व बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुका ह्या ताकतीने लढवल्या जातील सर्व ताकतीने कामाला लागा असे आव्हान माननीय संग्राम घाडगे पाटील यांनी केले आहे यावेळी जिल्ह्यांतील सर्व कार्यकर्ते जिल्हा कमिटीतील माजी सैनिक अशोक येडे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बबन ढाकणे, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष बीड भीमराव कुठे, शिरूर तालुका...

अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे पाटोद्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ढोल वाजुन केले स्वागत

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे पाटोदा तालुक्यात आगमन होताच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन स्वागत केले यावेळी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रे प्रसंगी बोलताना म्हटले आरक्षण वाचवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ह्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व ओबीसी समुदयास केले यावेळी पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

आरटीई प्रवेश द्यावेच लागतील;शिक्षणाधिकारी यांची मुख्याध्यापकांना नोटीसा

Image
आरटीई प्रवेश द्यावेच लागतील;शिक्षणाधिकारी यांची मुख्याध्यापकांना नोटीसा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्या अन्यथा आरटीई कायद्यानुसार शाळेवर कारवाई शिक्षणाधिकाऱ्याचे सर्व मुख्याध्यापकांना पत्र प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ - मनोज जाधव बीड (प्रतिनिधी ) शाळांचा फी प्रतिपूर्तीचा मुद्दा शाळा आणि शासनाचा आहे. यात शाळांना विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखता येणार नाहीत. असे असताना शाळा प्रवेशास नकार देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव आणि पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आले असल्याने याची दखल शिक्षणाधिकारी यांनी घेतली असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठवून आरटीई प्रवेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरटीई प्रवेश रोखल्यास आरटीई कायद्या अंतर्गत शाळांवर कारवाई करण्यात येईल असा दम देखील दिला आहे.       शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना लोटला तरी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आधीच उशिराने सुरू झालेली प्रक्रिया ...

रोजंदरी मजदुर सेनेच्या पाठपुराव्यास यश,कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांना न्याय मिळणार

Image
परळी (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत च्या आस्थापनेतील अधिनस्त कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा, मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित केले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि नगरपरिषद बीड आस्थापनेतील अधिनस्त कंत्राटी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी दिनांक ११ जून २०२४ पासून मा.जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यास प्रभारी जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी मा. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तारीख व वेळ घेण्यासाठी टिप्पणी तयार करण्याचे निर्देश संबंधित कर्मचारी यांना दिले.       याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ३१ जूलै २०२४ रोजी कार्यालयीन वेळेत संतप्त   सफाई कामगार तीव्र निदर्शने करून टोकाची भूमिका घेणार होते. परंतु जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तारीख व वेळ घ...

लाडकी बहिण योजना नका देऊ आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या ; मुळुकवाडी - मसेवाडी शिवरस्त्याची ग्रामस्थांची मागणी

Image
लाडकी बहिण योजना नका देऊ आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या ; मुळुकवाडी - मसेवाडी शिवरस्त्याची ग्रामस्थांची मागणी:- डॉ.गणेश ढवळे   लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निर्मळ वस्ती,मांडवे वस्ती, काटकर वस्ती,ढास वस्ती, शेळके वस्ती वरील जवळपास २०० ग्रामस्थांच्या रहदारीच्या मुळुकवाडी - मसेवाडी शिवरस्त्याची दुरावस्था असल्याने पावसाळ्यात मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट,दुधदुभते भाजीपाला,किराणा आदिंसाठी मसेवाडी गावात जावे लागते.पावसाळ्याचे ४ महिने अडचणींचा सामना करावा लागत असुन वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही रस्त्याची सोय होत नसल्याने ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली तर लक्ष्मी निर्मळ या पालकाने आम्हाला शासनाची लाडकी बहिण योजना नाही दिली तरी चालेल पण आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लाडकी बहिण योजना नको ; आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या:- लक्ष्मीबाई निर्मळ   ---- आमच्या लेकरांना पावसाळ्यात २ किलोमीटर चिखलातून विंचु ...

पत्रकार शेख आयेशा यांना एन फिल्मचा राष्ट्रीय उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

Image
 बीड प्रतिनिधी पाली बीड येथील महिला पत्रकार आयशा रफिक शेख  यांना  एन फिल्मचा  राष्ट्रीय सिने गौरव पुरस्कार 2024 छत्रपती संभाजी नगर येथे  दिमाखदार सोहळ्यात केला प्रधान. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून  राजू भाई  साबळे,एड. अविनाश थिटे, सुरेश शिनगारे, सुनील केतकर, दिपाली गरड, अनिल ढोले, आयुब पटेल, रंजीत मनोरे, पंचशीला जाधव आदी उपस्थित होते.या पुरस्कारा साठी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार शेख आयेशा यांची राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून निवड शिक्कामोर्तब झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर त्यामध्ये  प्रसिद्ध सिने अभिनेते अभिनेत्री, कलावंत, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिजाऊ हॉल मंदिर बाबा पेट्रोल म्हाडा कॉलनी येथे  प्रदान केला गेला आहे . एन फिल्म प्रोडक्शन आयोजित राष्ट्रीय सिनेगौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये कलावंतांसह सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा राष्ट्रीय उत्कृष्ट सेवा गौरव...

कुंभे जळगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सय्यद सद्दाम हारून यांची बिनविरोध

Image
 निवड बीड (सखाराम पोहिकर )गेवराई तालुक्यातील ब्राह्मगाव येथील युवक कार्यकर्ते कुंभेजळगाव ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदा मारून यांची आज आंबेजळगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीस कुंबेजळगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ कविता कुंडलिक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व सय्यद सद्दाम सय्यद हरून यांची उपसरपंच पदी निवड व्हावी अशी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने एकमताने निर्णय घेण्यात आला या निवडीचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने कुंभेजळगाव रामनगर तांडा व ब्रह्यगाव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सय्यद सलाम यांचे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले या उपसरपंच च्या निवडीसाठी कुंभेजळगाव चे ग्रामपंचायत सदस्य सोनिया समाधान कांबळे सुभाष श्रीराम राठोड समिंदर गणेश लेंडगुळे सौरव पांडुरंग गायकवाड सय्यद असावी हसन सय्यद सद्दाम व कुंभेजळगाव रामनगर तांडा ब्रह्यगाव येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीचा १६ लाख रुपये निधी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे २ वेळा अखर्चित ; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Image
च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीचा १६ लाख रुपये निधी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे २ वेळा अखर्चित ; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी:- डॉ.गणेश ढवळे   बीड:- बीड तालुक्यातील च-हाटा येथील जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत ८ वर्षांपासून ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत वीज जोडणी नसल्याने शोभेची वस्तू बनुन राहिली आहे.विद्युत पुरवठा नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी रहात नसुन कुठल्याही प्रकारच्या प्रसुती, शस्त्रक्रिया तसेच आंतररुग्ण सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असुन उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला जावे लागते.त्यामुळे वीजजोडणी साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,शेख युनुस,सुदाम तांदळे,शेब मुबीन यांनी दोन वर्षांपासून शासन दरबारी निवेदने तसेच आंदोलनाद्वारे पाठपुरावा केल्यानंतर १६ लक्ष रुपये निधीची तरतूद डॉ.उल्हास गंडाळ जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी करत बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता परंतु याबाबत बांधकाम विभागाने कोणतीही पुढील उ...

कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगार यांना तात्काळ न्याय द्यावा; अन्यथा आज संतप्त कामगार घेणार टोकाची भूमिका - गौतम आगळे सर

Image
परळी (प्रतिनिधी ) मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाई राजेश कुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार सहित इतर कामगारांना किमान वेतनासह प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी - सुविधा मिळाव्यात तसेच नगरपरिषद बीड आस्थापनेतील कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे या करीता धरणे आंदोलनाचा आजचा 50 वा दिवस संपला तरी अद्याप न्याय मिळाला नाही. जिल्हाधिकारी अविनाश पाठक दिनांक ३० जूलै रोजी गैर हजर राहिल्या मुळे तीव्र निदर्शने तुर्तास स्थगित करण्यात आले.अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.       याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ३० जूलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता संतप्त सफाई कामगार तीव्र निदर्शने करून टोकाची भूमिका घेणार होते, परंतु जिल्हाधिकारी अविनाश पाठक सांयकाळी ०६ वाजेपर्यंत कार्यालयात न आल्याने तुर्तास प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले. मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून त्यात त्यांन...

वंचित बहुजन आघाडी शेअर मार्केट मध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा देणार - प्रा किसन चव्हाण

Image
{ अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 दि ३०-७-२०२४ मंगळवार } याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी सोपानराव काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रवींद्र निळ, युवा तालुका अध्यक्ष सागर गरूड, सचिन कणसे, अवधूत केदार, दत्तात्रय औटी, बाबासाहेब थोरात,गहीनिनाथ कातकडेसर, वसंत औटी, सचिन शिंदे, अशोक कापरे,अन्सारभाई कुरैशी, साईनाथ भागवत,व इतर शेतकरी बांधव व व्यवसाईक उपस्थित होते यावेळी प्रा किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ज्यांची शेअर मार्केट मध्ये फसवणूक झाली असेल त्यांनी न घाबरता धाडसाने पुढे येऊन कुणाच्याही दबावाखाली न जाता ,बुधवार दि ७-८-२०२४ रोजी शेवगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उपस्थित रहावे शेवगाव पोलिस स्टेशन येथे शेअर मार्केट मध्ये फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या तक्रारी न घेणाऱ्या शेवगाव पोलीस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात य...

आरक्षण बचाव यात्रेच्या महासभेस एस्सी एसटी ओबीसीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- इंजि.विष्णु दादा देवकते

Image
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी .गेली अनेक वर्ष सातत्याने ओबीसींच्या आरक्षणाचा लढा अँड बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत एस्सी एसटी ओबीसीचे आरक्षण कायम रहावे व मराठ्यांसाठी आरक्षणाचे वेगळे ताठ असावे हि कायम भुमिका अँड बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत गेली कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ताधारी व विरोधक ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहेत त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेला आणि अशातच महाराष्ट्र पेटवू नये म्हणून कायम सातत्याने भुमिका घेत आहेत म्हणून एस्सी एसटी ओबीसी व मराठा बांधवांमध्ये जनजागृती होण्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी एस्सी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातुन सुरू केली आहे यात्रे निमित्त अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये"ओबीसी आरक्षण बचाव"महासभेचे आयोजन गेवराई शहरात ३१जुलै रोजी सायंकाळी 4०० वाजता करण्यात आले या सभेला संघर्षयोद्धा प्रा, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, प्रदेश आध्यक्षा रेखाताई ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष किसने चव्हाण,प्रा,विष्णु जाधव,ओबीसी नेते सोमनाथ सौळुंके, अविनाश भोसीकर,आशोक हिंगे,प्...

अवघ्या ६ हजारात लावली ८ ते १२ फुटी १५ झाडे; गंगाधरे, सूतनासे, युसूफ़ यांचा सक्रिय सहभाग

Image
'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण ना गाजावाजा, ना फटाके, ना हारतुरे, ना राजकारण्यांची मांदियाळी, ना कार्यकर्त्यांचा घोळका  अवघ्या ६ हजारात लावली ८ ते १२ फुटी १५ झाडे; गंगाधरे, सूतनासे, युसूफ़ यांचा सक्रिय सहभाग बीड (प्रतिनिधी ) - शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ यांच्या 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून साधारण दोन महिन्यापूर्वी वर्गणीतून वृक्षारोपण करण्याचे साहित्यिक, कवी अनंत सुतनासे यांनी सुचविले होते. यानंतर ग्रुप ॲडमिन एस.एम.युसूफ़ यांनी ग्रुपमध्ये आवाहन केले. त्याला ग्रुपमधील २९ सदस्यांनी पाठींबा देत वर्गणीतून ६३६५ रुपये जमा केले. यातून चांगली ८ ते १२ फूट उंच झाडांची १५ रोपे खरेदी करण्यात आली. याशिवाय माती आणि पाणीही खरेदी करून टाकण्यात आले. कुठलाही गाजावाजा न करता, फटाके न फोडता, हारतुरे न घेता, राजकारण्यांची मांदियाळी न जमविता, कार्यकर्त्यांचा घोळका न बोलवता अगदी साध्यापणाने 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंग...

राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत पिंपरी मध्ये डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय बैठक

Image
मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे साधला संवाद पुण्यात होणार पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय बैठक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष सनी शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पार पडली.या बैठकीत पुण्यात डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा होणार असून याबाबत पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार पुण्यात डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय बैठक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे तसेच राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, महिला पत्रकार श्रावणी कामत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, संतोष गोतावळे,महावीर जाधव, रामकुमार शेंडगे यांच्या उपस्...

वडवणी येथे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त ॲड.प्रकाश आंबेडकर साधणार संवाद.

Image
आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे:-संतोष बहिरे वडवणी /प्रतिनिधी    ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त दि.१ऑगस्ट २०२४गुरुवार रोजी सकाळी १०:३०वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवणी येथे येणार असून ते आरक्षण विषयी बहुजन समाजातील समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत तरी आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक समाजाचे युवा नेते संतोष भैय्या बहिरे यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे ओबीसी समाज म्हणतो कोणी आपल्यात घुसखोरी करु नये तर मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसीतुनच आरक्षण द्या या दोन्ही मुद्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक शितयुध्द पेटल्याचे वातावरण आहे. हे शितयुध्द थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे.ही यात्रा दि.१ ऑगस्ट गुरुवार रोजी वडवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ...

आम आदमी पार्टीचे मा. संग्राम घाडगे पाटील (संघटन मंत्री) महाराष्ट्र राज्य उद्या बीडमध्ये

Image
 बीड जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणार बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील 288 जागा आम आ आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे याचा आढावा घेण्यासाठीआम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे राज्यसचिव मा. संग्राम घाडगे पाटील हे 31 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभेच्या कार्यकर्त्यांशी संवाद इच्छुक उमेदवार यांची मुलाखत करतील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात पार्टी प्रवेश होणार आहे तरी बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11.00वा. पत्रकार परिषद दुपारी 01.00 कार्यकर्त्यांशी संवाद व आढावा घेतला जाईल या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या आदेशाने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे व तेथून पुढील कार्यक्रम हा त्यांच्या इच्छेनुसार असेल

डॉ महादेव मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड

Image
 जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार-डाॅ.मोहिते गेवराई प्रतिनीधी -तालुक्यातील मादळमोहि येथील रहिवाशी डॉ. महादेव मोहिते यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, डॉ. मोहिते यांना लहान पणापासुन च सामाजीक क्षेञात कार्य करण्याची आवड आसल्याने ते गेल्या चार-पाच वर्षापासुन आरोग्य सेवा ग्रामीन भागात राहुन रुग्ण सेवा देत आहेत ,याच बरोबर ते सामाजिक क्षेञात व राजकिय क्षेञात आग्रेसर असतात, ते गेल्या चार वर्षापासुन डॉक्टर सेलच्या माध्यामातुन कार्य करत होते या कार्याची दखल घेऊन डॉ सेल चे प्रदेश अध्यक्ष डॉ सुनील जगताप सर व मा.शरदचन्द्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरुन त्यांची डॉक्टर सेलच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्ती पञ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.जंयत पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले ,या वेळी बीडचे खासदार बजरंग सोनवने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गटाचे जिल्हाध्यक्ष संदिप भैय्या क्षीरसागर ,राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष डॉ, नरेन्द्र काळे सर,किसान आघाड...

स्वामी विवेकानंद आश्रम शाळा याची मान्यता रद्द करा व त्या शिक्षकाला फाशी द्या. पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे

Image
स्वामी विवेकानंद आश्रम शाळा याची मान्यता रद्द करा व त्या शिक्षकाला फाशी द्या. पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे . दलित विदयार्थ्यांचं हत्याकांड.... अरविंद खोपे, वय -13 इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा. उराशी स्वप्न बाळगून आई वडिलांनी त्याला लातुर ला शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठविले, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा,आपला मुलगा मोठा होऊन गरिबी दुर करेल हे स्वप्न आई वडिलांचे होते. आईवडील मिळल ते काम करून उपाजीविका भागवीत आहे. वडील मुंबई मध्ये कामासाठी माझा अरविंद मोठा होऊन, घराण्याच नाव उज्ज्वल करेल या स्वप्नात वावरत होते.                आश्रम शाळेत अरविंद ची परीक्षा आहे म्हणुन आई वडिलांनी पांगरी(परळी, जि-बीड)येथून अरविंद ला आश्रम शाळेत लातुर ला सोडले, काल दिनांक 29/07/2024 रोजी अरविंद च्या आई वडिलांना शिक्षकांनी अरविंद च्या आई वडिलांना फोन केला. तुमच्या अरविंद च्या पोटला काहीतरी लागलंय त्याच्या पोटातून रक्त येताय, आश्रम शाळेपासून गाव दुर असल्यामुळ नातेवाईकांना तिथं पाठवलं.तर शिक्षकांनी सांगितलं अरविंद पळून गेला. दुपारी आई वडिलांना फोन धडाकाला अरविंद ...

कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांना न्याय देण्यासाठी धरणे आंदोलनाचा 48 वा दिवस सुरू

Image
परळी (प्रतिनिधी ) मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाई राजेश कुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार सहित इतर कामगारांना किमान वेतनासह प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी - सुविधा मिळाव्यात तसेच नगरपरिषद बीड आस्थापनेतील कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे या करीता धरणे आंदोलनाचा आजचा ४८ वा दिवस संपला तरी अद्याप न्याय मिळाला नाही, अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.       याबाबत सविस्तर वृत्त असे की मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून त्यात त्यांनी राज्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत मधील कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन प्रदान करणे बंधनकारक आहे. कंत्राटी कामगार ( नियम व निर्मूलन ) अधिनियम 1970 नुसार कामाच्या पद्धती व स्थिती त्यांना आरोग्य व सुखसुई मिळतात किंवा नाही आधी बाबींची तपासणी बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत यांनी करणे आवश...

बीड न.प.कर्मचारी नलावडे यांना तात्काळ निलंबित करा - ॲड.धम्मानंद वाघमारे

Image
    बीड प्रतिनिधी - बीड नगर पालीकेमधील नगर रचना कार्यालयामध्ये नलवडे नामक महिला कर्मचारी यांनी अर्वाच्च भाषेचा वापर करून अपमानित केले आहे. तरी संबंधित बीड न.प.कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. बीड नगरपालिकेमधील नगर रचना कार्यालयामध्ये कामाच्या वेळेमध्ये कर्मचारी गैरहजर होते. तसेच त्या विभागाच्या नलवडे नामक महिला कर्मारी यांना विचारणा केली असता त्यांनी "तुमचे कामे मी करत नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करा आम्ही कार्यालयात असुत किंवा नसुत तुम्ही काय आमचे मालक आहात का? तुम्ही सीओंकडे जा अथवा कलेक्टर यांच्याकडे जा आम्हाला काही फरक पडत नाही" असे बोलून त्यांनी कार्यालयाच्या बाहेर हाकलून लावले व अपमानित केले असून आपण संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा दि.३१.०७.२०१४ रोजी नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात भोंगळ कारभाराच्या विरोधात नगर पालिकेसमोर बेमुदत अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल तरी कार्यवाही करावी अशी भीम दल प्रमुख ऍड.धम्मानंद वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

धानोरा रोडच्या दुरावस्थे संदर्भात नितेश उपाध्ये यांचे आमरण उपोषण

Image
उपोषणाची दखल न घेतल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा बीड (प्रतिनिधी ) गेल्या सहा ते सात वर्षांपासून बीड शहरातील नगर रोड पासून जाणाऱ्या धानोरा रोडची अत्यंत दुरावस्था झाली आहे या धानोरा रोड परिसरात जवळपास 15 ते 20 हजार लोक वस्ती आहे तसेच या परिसरात चार शैक्षणिक संस्था असुन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारावर आहे त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते सध्या पावसाळा सुरू झाला असून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जात असताना अक्षरशा गुडघाभर पाण्यातून जावे लागते तसेच या रोडलगत असलेल्या व्यापाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे मात्र याकडे प्रशासन साप दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमवार दि. 29/7/2024 पासून नितेश उपाध्ये हे आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले असून या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

३१ जुलै रोजी एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम विनामूल्य कार्यक्रम

Image
३१ जुलै रोजी एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम विनामूल्य कार्यक्रम  रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड (प्रतिनिधी ) - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक ३१ जुलै बुधवार रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात पीस बुक डेपोकडून गायक एम.एम.शेख यांनी एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी हा गीत संगीताचा कार्यक्रम मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनामूल्य आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा गायक एम.एम.शेख यांनी केले आहे. देशातील अनेक भाषांमध्ये आपल्या सुमधुर, तालबद्ध व लयबद्ध गीतांनी अजरामर झालेले पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची येत्या ३१ जुलै रोजी पुण्यतिथी आहे. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पीस बुक डेपो कडून गायक एम.एम.शेख हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी हा कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक गायक, गायिका या कार्यक्रमात आपली गायनकला श्रोत्यांसाठ...

तब्बल ५५ लाख रुपये खर्चून ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली ; आता शिक्षकांची सोय पण आम्हीच करायची का?

Image
तब्बल ५५ लाख रुपये खर्चून ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली ; आता शिक्षकांची सोय पण आम्हीच करायची का?? पोखरी (घाट) ग्रामस्थांचा सवाल :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश :- बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजूर, शेतमजुर ग्रामस्थांनी आपल्या हातातील कोयता मुलांच्या हाती पडु नये म्हणून लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कष्टाच्या पैशातुन लोकवर्गणीतून तब्बल ५५ लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेजंग इमारत बांधली.मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन वारंवार लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली आता शिक्षक सुद्धा आम्हीच द्यायचे का?? असा संतप्त सवाल पोखरी (घाट) ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षक मिळाले नाहीतर शिक्षणाधिका-यांच्या कार्यालयात शाळा भरवणार:- बिभीषण मुळीक ( सरपंच पोखरी (घाट ) --- पोखरी (घाट) येथे जिल्हा परीषदेची १ ली ते ८ वी पर्यंत शाळा आहे.विद्यार्थी पटसंख्या १५९ आहे.शाळेत फक्त ५ शिक्षक आहेत. शिक्षण विभागा...

जरांगे पाटलांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात-सुरेश पाटील

Image
बीड (प्रतिनिधी )      मराठा समाजाला व मुस्लीम समाजाला सरसकट आरक्षण मिळवायचे असेल तर येणाऱ्या विधानसभेला २८८ जागा लढवाव्यात आणि मराठा आरक्षणासाठी सगे-सोयरेचा अध्यादेश स्वतः काढावा. अशी विनंती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.      मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी किती तीव्र आंदोलन केली आहेत. याचा फायदा समाजाला झालेला आहे. परंतु सगे सोयऱ्यावर कोणीही आता बोलायला तयार नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार सरसकट मराठा आरक्षण असेल किंवा मुस्लिम आरक्षण असेल किंवा सगे-सोयरेचा अध्यादेश असेल देवू शकत नाही हे आता स्पष्ट झालेले दिसते. कोणताही नेता कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ असे आश्वासन देत नाही. म्हणून सत्तेत जाऊनच मराठा व मुस्लीम समाजाचा प्रश्न मिटवावा लागेल जे मिळवायचे ते सत्तेत जाऊनच मिळवावे लागेल.! असा ठाम विश्वास शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी समाजमाध्यमात बोलतांना सांगितले आहे.      आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक वर्षे मत मिळवण्यासाठी चर्चिला जातो निवडणूका आल...

बीड येथील आरक्षण बचाव यात्रेत एससी, एसटी ओबीसीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर

Image
 ऍड.प्रकाश आंबेडकर यांची गेवराई येथे 31 जुलै रोजी आरक्षण बचाव महासभेचे आयोजन  बीड प्रतिनिधी - आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून एड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. एससी एसटी ओबीसी यांच्या आरक्षणाचा लढा अँड बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत एसी एसटी ओबीसीचे आरक्षण कायम रहावे व मराठ्यांसाठी आरक्षणाचे वेगळे ताठ असावे हि कायम भुमिका अँड. बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत गेली कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ताधारी व विरोधक ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेला आणि अशातच महाराष्ट्र पेटवू नये म्हणून कायम सातत्याने भुमिका घेत आहेत म्हणून एसी, एसटी, ओबीसी व मराठा बांधवांमध्ये जनजागृती होण्यासाठी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एसी, एसटी,ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातुन सुरू केली आहे यात्रे निमित्त अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये" आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्यात येत आहे. त्या निमित्...

आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी,माजी आ. भिमराव धोंडे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

Image
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :                आष्टी मतदारसंघात शेजारील जिल्ह्यातील मतदारांची बोगस कागदपत्रांच्या आधारे बनावट मतदार नावनोंदणी चालू आहे याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी माजी आ. भिमराव धोंडे यांनी केली आहे . याबाबत बीडचे जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे .     याबाबत राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आष्टीच्या तिन्ही बाजूने अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे. या लगतच्या गावात मतदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या काही निवडणुकीत मतदार वाढवून कार्यक्षेत्रा बाहेरील मतदारांनी मतदान केले होते . आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक मतदानाची जुळवाजुळव करून बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थानिक रहिवासी नसलेल्या बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे . नांव नोंदणी करणारे बी. एल. ओ. यांनी अशाप्रकारे संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांची तसेच ज्या संशयित मतदारां...

आष्टी/ पाटोदा /शिरुर विधानसभा मतदारसंघात मनसे निवडणुक लढवणार कैलास दरेकर यांना मनसेचा चेहरा म्हणून संधी

Image
 !  आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :               मनसेचे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढणार अशी घोषणा केली असून , मनसेने पक्षांतर्गत चाचपणी सुरू केली असून , तसा गोपनीय अहवाल घेतल्याचेही राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यातील भाषणात जाहिर केले . आष्टी/पाटोदा/शिरुर विधानसभा मतदारसंघाचा विचार झाल्यास पक्षाकडे पक्षातील एकमेव आश्वासक चेहरा फक्त कैलास दरेकर असून , गेली सतरा वर्षे पक्षाच्या चढ उताराचा काळात ठामपणे पक्षाची बाजू आष्टी मतदारसंघात मांडली गेली , गेल्या काही वर्षात मनसेचे कैलास दरेकर यांनी अनेक आंदोलने केली असून , २०१६ शेतकरी कर्जमाफीसाठी आष्टी ते मुंबई सायकल मोर्चा असेल, शेतकऱ्यांचा उडीद हमी भावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन , वैयक्तिक विहीर, शेत तलाव योजनेत शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन लाभ दिला जातो , तसेच घरकुल योजनेचा जास्तीचे बांधकाम फिस वसूली असेल , शौचालय घोटाळा असेल यावर अशा अनेक प्रश्नांवरून आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना कैलास दरेकर आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने पाह...

बीड MIM ( इन्क़लाब ) पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पदी शेख मुस्तफा यांची निवड

Image
परळी प्रतनिधी - दि.28 रोजी परळी शहरात ऑल इंडिया मजलीसे इन्कलाबे मिलल्त पक्षाचा कार्याकरता मेळावा संपन्न झाला,या मेळाव्यात परळी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्तफा यांची MIM इन्क़लाब या पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्षपदी एकमताने औरंगाबाद येथील शेख समद भाई बागवान,महाराष्ट्र कोर कमेटी सदस्य व इंखलाब पक्षाचे नेते शेख सलीम शेख मेहबूब भाई, (परभणी) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन एक मताने निवड करण्यात आली, यावेळेस नगरसेवक पठाण ताज खान सुलेमान भाई मणियार,हिदायत भाई (सायगाव) शेख मुशरफ, आयान खान, शेख शोएब, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शैलेंद्र पोटभरे यांची रिपाई एकतावादी च्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड

Image
 बीड प्रतिनिधी - मुंबई ठाणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची राष्ट्रीय कार्यकारणी व महाराष्ट्र कार्यकारणीची बैठक दिनांक 28 जुलै , रोज रविवार घेण्यात आली. या बैठकीस रिपाई एक्कावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे व राष्ट्रीय उपाध्यक्ष दौलत रामजी साहेब दिल्ली राहुल भूल नागपूर रिपाई राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे महाराष्ट्र अध्यक्ष विकास निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष संघटन व कार्याची दखल घेत रिपाई एकतावादी चे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांची मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवड झाल्याबद्दल त्यांच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

तलवाडा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

Image
गेवराई (सखाराम पोहिकर ) .दिनांक 28 जुलै २०२४ गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा विजेचा शोक बसल्याने जागीच मूर्ती झाली जी घटना काल रात्री उशिरा घडली पाण्याचे मोटर चालू करत असताना अचानक हातावर बाहेर पडल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे ग्रामपंचायतने गावठाण विहिरीवर विद्युत पुरवठा करणाऱ्या मोठी जवळ बॉक्सची व्यवस्था केली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांपासून मसु विश्वभर अडागळे वय 27 वर्षे हे शिपाई म्हणून काम करत होते त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी होती दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी ते अंबिका नगर येथील पाणीपुरवठा करण्यासाठी गावठाण विहिरीवर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते मोटर चालू करत असताना त्यांच्या हातावर बाहेर पडल्याने करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी गाव घेतली घटनेची माहिती मिळतात स पो नि सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि स्वप्नील कोळी . ब...

राम राऊत प्रतिष्ठानचे दिव्यांगासाठी केजयेथे भव्य मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबीर

Image
राम राऊत प्रतिष्ठानचे दिव्यांगासाठी केजयेथे भव्य मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबीर गरजु रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा - रामहरी राऊत केज येथे दिव्यांग बांधवासाठी राम राऊत प्रतिष्ठानचा भव्य आरोग्य मेळावा. केज | बीड : रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानमध्ये बाळगून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये राम राऊत सामाजिक प्रतिष्ठान तर्फे केज शहरातील दिव्यांग बांधवासाठी मोफत कृत्रिम हात- पाय उपकरणे वाटप शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर दि ०३ ऑगस्ट शनिवार ते ४ ऑगस्ट रविवार सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत असणार आहे. शिबिराचे ठिकाण शिक्षक पतसंस्था हाॅल, पंचायत समिती ग्राऊंड, केज, येथे आहे. या मोफत शिबीरामध्ये प्रत्येक दिव्यांग बांधवांना राम राऊत सामाजिक प्रतिष्ठान मार्फत मोफत कृत्रिम हात-पाय उपकरणे वाटप केले जाणार आहेत. तसेच सोबत प्रतिष्ठानच्या रुग्ण सेवकांकडुन आरोग्य विषयक मार्गदर्शन ही केले जाणार आहे. या शिबीराचे आयोजक श्री. रामहरी राऊत असून ते राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख ही आहेत. ते लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहे...

आम आदमी पार्टीची आष्टी येथे आढावा बैठक संपन्न

Image
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :               आष्टी येथे आम आदमी पार्टीच्या आष्टी/ पाटोदा/ शिरूर मतदारसंघाची आढावा बैठक शनिवार, २७ जुलै रोजी घेण्यात आली . महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेसाठी पक्षाने सर्व २८८ जागांवर लढण्याचा निर्धार घेतला असून, त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती . बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीची आणि रणनीतीची सविस्तर चर्चा करण्यात आली असून या बैठकीस आप बीड जिल्हाध्यक्ष श्री. अशोक जी येडे, आप आष्टी तालुका अध्यक्ष डॉ. महेश नाथ, जिल्हा सचिव रामधन जमाले, शिरूर तालुका अध्यक्ष अस्मान जरांगे, सुहास चौधरी, ऍड. सोमनाथ राक्षे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब ढाकणे, बाबाबुराव धवन, जालिंदर ठोंबरे, अंबादास चव्हाण, विष्णू गिरी, मनोज विधाते, देविदास मोरे, अंबादास नरुटे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते .     बैठकीत पक्षाच्या आगामी योजना, प्रचार रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या भूमिका यावर सखोल विचारविनिमय करण्यात आले असून ,महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि विजय सुनिश्चित करण्यास...

चौसाळा येथिल साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी कपिल मस्के

Image
(बीड प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील चौसाळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शाहु नगर येथे लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांच्या मार्गदर्नाखाली या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. सर्वानुमते लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतिच्या अध्यक्षपदी शाहु नगर येथिल युवा कार्यकर्ते कपिल मस्के तर उपाध्यक्षपदी रवी सोनवणे तर सचिवपदी लखन सोनवणे यांची निवड करण्यात आली या बैठकिस चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकणे,एकता ग्रुपचे अध्यक्ष स्वपनील सोनवणे,जितीन काळे,आदेश बोबडे,विकास खोसे पाटील,साहील सोनवणे,विजय क्षीरसागर,कृष्णा चव्हाण,धर्मराज सोनवणे,प्रविण सोनवणे,सचिन सुरवसे पाटील,दादा गायकवाड यांच्यासह अनेक युवक मोठया संख्येने उपस्थित

आरक्षण बचाव यात्रेच्या सभेला सर्व बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.

Image
गेवराई (प्रतिनिधी ) दि. २८ महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापलेले असतांना, ओबीसी समाज म्हणतो कोणी आपल्यात घुसखोरी करु नये तर मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसीतुनच आरक्षण द्या या दोन्ही मुद्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक शितयुध्द पेटल्या सारखे आहे. पेटलेले शित युध्द थोपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दि. ३१ जुलै बुधवार रोजी गेवराई जि.बीड येथे सायंकाळी ठीक ५ वाजता येणार असून याठिकाणी सभा घेणार आहेत तरी सर्व आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचितचे विष्णु देवकते, पप्पु गायकवाड, राजु पोकळे, किशोर भोले, रेवन गायकवाड, ज्ञानेश्वर हवाले, मुबारक शेख, रामदास मोरे, सचिन कांडेकर, श्रीकृष्ण खेडकर, अनिल बोराडे तसेच भारतिय बौध्द महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन युवक आघाडी व तसेच वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत सम्यक विद्यार्थी अंदोलन, माथाडी कामगार, डॉक्टर, वकिल, शिक्षक, पेन्शनधारी असोशियशन यांच्या वतिने करण्यात आले आहे.  आ...

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिया डोईफोडे यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान

Image
बीड दि.२६ (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या बीड जिल्हाध्यक्षा प्रिया डोईफोडे यांच्या वतीने कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील राष्ट्रवादी कार्यालय येथे दि.२१ जुलै रोजी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक डॉक्टरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट डॉक्टर म्हणून डॉ.शिशिर खोसे (त्वचारोग तज्ञ), डॉ.संदीप येवले(एम.डी.मेडिसिन) डॉ.अर्चना धूत (स्त्रीरोग तज्ञ) डॉ.हनुमंत पारखे (बालरोग तज्ञ)  डॉ.महेंद्र गौशाल (एम.डी. होमिओपॅथी अँड एम.बी.ए. हेल्थ केअर) डॉ.पप्पू भिसे (पशुवैद्यकीय) या सर्व डॉक्टर आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. याव...

दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक मेंहकर येथे संपन्न

Image
दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक मेंहकर येथे संपन्न            संपादकांनी वृतपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही नैतिक जबाबदारी संपादक उद्धव ( माऊली ) फंगाळ बीड (सखाराम पोहिकर ) मेहकर येथे आज बैठक घेऊन या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली प्रथम वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणे . पत्रकारांचे हितसंबंध जोपासणे . त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे . त्याचबरोबर पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे . त्यांच्या व्यावसायिक उत्पन्न वाढीसाच्या प्रश्नात लक्ष घालून ते सोडविण्याचे प्रयत्न करणे इत्यादी . अनेकविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना राज्यभर कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करून वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी संपादकांनी पुढाकार घेणे ही प्रत्येक संपादकाची नैतिक जबाबदारी आहे आसे आवाहन 27 जुलै 2024 रोजी शासकीय विश्रामगृह डोणगाव रोड मेहकर येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यक्रमाचे प...

बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्टला तरी मोफत शालेय गणवेश मिळणार का? दिड महिना उलटूनही विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत

Image
बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्टला तरी मोफत शालेय गणवेश मिळणार का?? दिड महिना उलटूनही विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत:- डॉ.गणेश ढवळे   लिंबागणेश:- राज्यसरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून "एक राज्य एट गणवेश" योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असुन समग्र शिक्षा अभियान व मोफत गणवेश वाटप योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन यामध्ये एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांतर्फे शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.तर स्काऊट या विषयास एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.मात्र शाळा सुरू होऊन दिड महिना तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मिळणार का?? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.   निधी प्राप्त होताच मोफत गणवेश वाटप करण्यात येई...

अखेर रोहन गलांडे पाटील यांच्या उपोषनाला आले यश

Image
अखेर रोहन गलांडे पाटील यांच्या उपोषनाला आले यश  पत्रकार, सरपंच,माजी आमदार, प्रशासनाने सोडले उपोषण केज/प्रतीनिधी   केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकास कामाला काम सुरू करण्यासाठीची तीर्थक्षेत्राचे काम प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसले होते तरी उपोषणाच्या तीसऱ्या दीवशी सार्वजनिक बांधकाम केज यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली व मागण्या तीर्थक्षेत्राचे काम सुरू केल्यानंतर पुर्ण करण्यासाठी पाच मागणी मान्य,काम सुरू केल्यानंतर बंद करण्यात येणार नाही मागणी मान्य,तीर्थक्षेत्रांच्या कामासाठी लागणारी पुर्ण सामग्री कार्यक्षेत्रात उपलब्ध कधी तर उपलब्ध केली आहे मागणी मान्य ,तीर्थक्षेत्र तात्काळ कामाला स्वता गुत्तेदार , बांधकाम विभागाचे अधिकारी, गावकरी यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात यावे मागणी मान्य.काम बंद केले तर याला जबाबदार कार्यकारी अभियंता युवराज मळीकर आहे  वरील प्रमाणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व मागण्या मान्य करुन व इतर मागण्या व मागिल उपोषणातील मागण्या मान्य करून प्रत्यक्ष कामाला सुरुव...

शिरुर कासार बसस्टँड मधे जाण्यासाठी पाण्यातुन मार्ग

Image
  आठ दिवसांत बसस्थानका मध्ये येणारे दोन्ही रस्ते दुरुस्त नाही केले आणि प्रवाशांची गैरसोय झाली तर ! शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा - शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर / तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :               शिरुर बसस्टँड मधे येणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करत यावे लागत असून, प्रवाशांना पाण्यातुन यावं लागतं असून, सर्व परिसर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे / कचऱ्या मुळे फारच घाण झाला असून, याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची ? एसटि मंडाळाचे डिसी यांच्याशि बरोबर फोनवर संपर्क साधून चर्चा करून त्यांच्या कानावर सर्व प्रकार घातला असून , बसस्टँडला येणारे रोड दुरुस्त करायचे सांगितले असून, त्यांनी दुरुस्त करु म्हणुन सांगितले . पण आमच्या वेळेला करु मला आताच सांगता येणार नाही?ते अधिकारी आहेत.त्यांच्या मर्जीने काम होईल! पण इथं रोजच प्रवाशांना त्रास सहन कराव लागतो त्याच काय? रोजच चार/ पाच प्रवासी त्या खड्यात आणि घाण पाण्यात पडतात.याला जबाबदार कोण? आज शिरुर मधे चांगले काम करायचे आसल्यास मांजरा पेक्षा ...

शिरूरमध्ये जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
   शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध-माजी आ. भीमराव धोंडे आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :              शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करणे, जि. प. शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मी बीड पासुन ते मंत्रालयापर्यंत प्रयत्न करील असे आश्वासन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिरूर कासार येथे शिक्षक परिषदेत बोलताना दिले .    आष्टी /पाटोदा /शिरूर /विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी गुरुवार दिनांक २५ जुलै रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत शिरूर कासार शहर / बाजारपेठेत फिरून लोकांच्या भेटी घेऊन व वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन स्वागत करण्यात आले. असुन, आष्टी/ पाटोदा/कडा नंतर शिरूर शहरातील दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .    जि.प. शाळेत शिरूर...