डॉ महादेव मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड

 जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार-डाॅ.मोहिते

गेवराई प्रतिनीधी -तालुक्यातील मादळमोहि येथील रहिवाशी डॉ. महादेव मोहिते यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, डॉ. मोहिते यांना लहान पणापासुन च सामाजीक क्षेञात कार्य करण्याची आवड आसल्याने ते गेल्या चार-पाच वर्षापासुन आरोग्य सेवा ग्रामीन भागात राहुन रुग्ण सेवा देत आहेत ,याच बरोबर ते सामाजिक क्षेञात व राजकिय क्षेञात आग्रेसर असतात, ते गेल्या चार वर्षापासुन डॉक्टर सेलच्या माध्यामातुन कार्य करत होते या कार्याची दखल घेऊन डॉ सेल चे प्रदेश अध्यक्ष डॉ सुनील जगताप सर व मा.शरदचन्द्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरुन त्यांची डॉक्टर सेलच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्ती पञ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.जंयत पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले ,या वेळी बीडचे खासदार बजरंग सोनवने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गटाचे जिल्हाध्यक्ष संदिप भैय्या क्षीरसागर ,राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष डॉ, नरेन्द्र काळे सर,किसान आघाडी सेलच्या प्रदेश अध्यक्षा पुजाताई मोरे, युवक चे प्रदेश अध्यक्ष शेख महेबुब भाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बीड जिल्हा दौ-यावर मा.जंयत पाटील साहेब आले आसता त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले. त्यांची डॉक्टर सेलच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला,त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकिय व ईतर क्षेञातील मान्यवरांनी त्याना भेटुन शुभेच्छा व अभिनंदन केले .  

बीड जिल्हात डॉक्टरांवर मोठया प्रमाणात हल्ले होत आहेत त्याच बरोबर हाॅस्पिटलची देखील तोडफोड करुन मोठया प्रमाणात नुकसान केले जात आहे ,आशा घटना घडु नयेत म्हणुन डॉक्टरांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहे , सर्व डॉक्टर हे प्रमाणीपणे रूग्णसेवा करत आसतात एखादया अंत्यत सिरियस पेंशटला वाचवू शकत नाहीत याचा राग धरुन पेंशटचे नातेवाईकाकडुन डॉक्टर वरती हाल्ले केले जातात आशा वेळी या पदाचा वापर डॉक्टररांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देईल ,त्याच बरोबर बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे पेंशटची आर्थिक लुट केली जाते हे थांबविण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न करणार आहे ,बीड जिल्ह्यात डॉक्टर सेलचे संघटन मोठया प्रमाणात करणार आहे प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी निमार्ण करणार ज्या डॉक्टर वर अन्याय झाला त्याना न्याय मिळवुन देण्यासाठी लढा उभा करणार व तसेच संघटनेचा वापर शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करणार आहे.. -डाॅ. महादेव मोहिते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी