बीड येथील आरक्षण बचाव यात्रेत एससी, एसटी ओबीसीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर

 ऍड.प्रकाश आंबेडकर यांची गेवराई येथे 31 जुलै रोजी आरक्षण बचाव महासभेचे आयोजन 

बीड प्रतिनिधी- आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून एड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. एससी एसटी ओबीसी यांच्या आरक्षणाचा लढा अँड बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत एसी एसटी ओबीसीचे आरक्षण कायम रहावे व मराठ्यांसाठी आरक्षणाचे वेगळे ताठ असावे हि कायम भुमिका अँड. बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत गेली कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ताधारी व विरोधक ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेला आणि अशातच महाराष्ट्र पेटवू नये म्हणून कायम सातत्याने भुमिका घेत आहेत म्हणून एसी, एसटी, ओबीसी व मराठा बांधवांमध्ये जनजागृती होण्यासाठी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एसी, एसटी,ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातुन सुरू केली आहे यात्रे निमित्त अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये" आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्यात येत आहे. त्या निमित्ताने "महासभेचे आयोजन गेवराई शहरात ३१जुलै रोजी सायंकाळी ४:०० वाजता करण्यात आले असून ऐतिहासिक आरक्षण बचाव महासभेस गेवराई विधानसभा मतदारसंघातील एसी, एसटी, ओबीसी यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक डॉ. नितीन सोनवणे, व जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी