आष्टी/ पाटोदा /शिरुर विधानसभा मतदारसंघात मनसे निवडणुक लढवणार कैलास दरेकर यांना मनसेचा चेहरा म्हणून संधी
 ! 
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :    
          मनसेचे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढणार अशी घोषणा केली असून  , मनसेने पक्षांतर्गत चाचपणी सुरू केली असून  , तसा गोपनीय अहवाल घेतल्याचेही राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यातील भाषणात जाहिर केले . आष्टी/पाटोदा/शिरुर  विधानसभा मतदारसंघाचा विचार झाल्यास पक्षाकडे पक्षातील एकमेव आश्वासक चेहरा फक्त कैलास दरेकर  असून  , गेली सतरा वर्षे पक्षाच्या चढ उताराचा काळात ठामपणे पक्षाची बाजू आष्टी मतदारसंघात मांडली गेली , गेल्या काही वर्षात मनसेचे कैलास दरेकर यांनी अनेक आंदोलने केली असून  , २०१६ शेतकरी कर्जमाफीसाठी आष्टी ते मुंबई सायकल मोर्चा असेल, शेतकऱ्यांचा उडीद हमी भावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन , वैयक्तिक विहीर, शेत तलाव योजनेत शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन लाभ दिला जातो  , तसेच घरकुल योजनेचा जास्तीचे बांधकाम फिस वसूली असेल ,  शौचालय घोटाळा असेल यावर अशा  अनेक प्रश्नांवरून आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना कैलास दरेकर आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने पाहीलेले असून  , मनसे ने  २२५ ते २५० जागा लढल्यास आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघात मनसेचा चेहरा म्हणून कैलास दरेकर यांना संधी मिळू शकते  ! यात तिळमात्र शंका नाही  .
Comments
Post a Comment