च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीचा १६ लाख रुपये निधी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे २ वेळा अखर्चित ; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीचा १६ लाख रुपये निधी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे २ वेळा अखर्चित ; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- बीड तालुक्यातील च-हाटा येथील जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत ८ वर्षांपासून ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत वीज जोडणी नसल्याने शोभेची वस्तू बनुन राहिली आहे.विद्युत पुरवठा नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी रहात नसुन कुठल्याही प्रकारच्या प्रसुती, शस्त्रक्रिया तसेच आंतररुग्ण सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असुन उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला जावे लागते.त्यामुळे वीजजोडणी साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,शेख युनुस,सुदाम तांदळे,शेब मुबीन यांनी दोन वर्षांपासून शासन दरबारी निवेदने तसेच आंदोलनाद्वारे पाठपुरावा केल्यानंतर १६ लक्ष रुपये निधीची तरतूद डॉ.उल्हास गंडाळ जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी करत बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता परंतु याबाबत बांधकाम विभागाने कोणतीही पुढील उपाययोजना न केल्याने तो निधी अखर्चित झाला असुन अशा बेजबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत आरोग्यमंत्री,अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, संचालक, सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, पुणे यांना करण्यात आली आहे.
२ वर्षांपासून पाठपुराव्यानंतर १६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता :- डॉ.गणेश ढवळे
---
८ वर्षांपासून वीज जोडणी अभावी प्रसुती, शस्त्रक्रिया,आंतर रुग्ण विभाग आदि.आरोग्य सुविधा मिळत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी देण्यात यावा यासाठी दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी च-हाटा येथे रास्ता रोको आंदोलन तसेच दि.४ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे तसेच दि.८ एप्रिल २०२४ रोजी च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वडगाव शिक्रापूर ते चाकण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानंतर १६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.सन २०२२-२३ आणि २०२३-२४ मिळुन दोन वेळा निधी मंजूर होऊनही बांधकाम विभागाकडून निधी खर्च करण्यात आला नाही यामुळे बांधकाम विभागाच्या बेजबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला निधी अखर्चित असुन पुढील बैठकीत वर्ग करण्यात येईल:- डॉ.उल्हास गंडाळ; जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
---
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या आदेशान्वये जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व विस्तारीकरण करणे लेखाशीर्ष अंतर्गत प्राथमिक आरोग्य च-हाटा येथील आरोग्य केंद्रासाठी विद्युत रोहित्र (डि.पी.) बसविणे व इतर संलग्न कामासाठी १६ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला होता.परंतु त्यावर बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने तो अखर्चित राहिला असुन पुढील वार्षिक योजनेच्या बैठकीत मंजूर करण्यात येईल.
Comments
Post a Comment