आम आदमी पार्टीची आष्टी येथे आढावा बैठक संपन्न


आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :     
         आष्टी येथे आम आदमी पार्टीच्या आष्टी/ पाटोदा/ शिरूर मतदारसंघाची आढावा बैठक शनिवार, २७ जुलै रोजी घेण्यात आली . महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेसाठी पक्षाने सर्व २८८ जागांवर लढण्याचा निर्धार घेतला असून, त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती .
बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीची आणि रणनीतीची सविस्तर चर्चा करण्यात आली असून या बैठकीस आप बीड जिल्हाध्यक्ष श्री. अशोक जी येडे, आप आष्टी तालुका अध्यक्ष डॉ. महेश नाथ, जिल्हा सचिव रामधन जमाले, शिरूर तालुका अध्यक्ष अस्मान जरांगे, सुहास चौधरी, ऍड. सोमनाथ राक्षे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब ढाकणे, बाबाबुराव धवन, जालिंदर ठोंबरे, अंबादास चव्हाण, विष्णू गिरी, मनोज विधाते, देविदास मोरे, अंबादास नरुटे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते .
    बैठकीत पक्षाच्या आगामी योजना, प्रचार रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या भूमिका यावर सखोल विचारविनिमय करण्यात आले असून ,महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि विजय सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना ठरविण्यात आल्या .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी