पत्रकार शेख आयेशा यांना एन फिल्मचा राष्ट्रीय उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान


 बीड प्रतिनिधी
पाली बीड येथील महिला पत्रकार आयशा रफिक शेख  यांना  एन फिल्मचा  राष्ट्रीय सिने गौरव पुरस्कार 2024 छत्रपती संभाजी नगर येथे  दिमाखदार सोहळ्यात केला प्रधान. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून  राजू भाई  साबळे,एड. अविनाश थिटे, सुरेश शिनगारे, सुनील केतकर, दिपाली गरड, अनिल ढोले, आयुब पटेल, रंजीत मनोरे, पंचशीला जाधव आदी उपस्थित होते.या पुरस्कारा साठी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार शेख आयेशा यांची राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून निवड शिक्कामोर्तब झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर त्यामध्ये  प्रसिद्ध सिने अभिनेते अभिनेत्री, कलावंत, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिजाऊ हॉल मंदिर बाबा पेट्रोल म्हाडा कॉलनी येथे  प्रदान केला गेला आहे .
एन फिल्म प्रोडक्शन आयोजित राष्ट्रीय सिनेगौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये कलावंतांसह सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा राष्ट्रीय उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . महाराष्ट्रात किन्नर कम्युनिटीवर पत्रकार शेख आयेशा यांच्या कामाची दखल घेऊन एन फिल्म त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट कार्यकर्त्या आणि पत्रकार 2024 या पुरस्काराचे मानकरी म्हणून निर्माता दिग्दर्शक दीपक म्हस्के आणि निर्माता दिग्दर्शक लेखक हिरामण मनोहर यांनी जाहीर केले होता.  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आला . या पुरस्कारासाठी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार शेख आयेशा यांची मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कंकाळ यांनी केले तर  या पुरस्काराचे आयोजन दीपक मस्के व हिरामण मनोहर व त्यांच्या टीमने कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी