जरांगे पाटलांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात-सुरेश पाटील
बीड (प्रतिनिधी)
मराठा समाजाला व मुस्लीम समाजाला सरसकट आरक्षण मिळवायचे असेल तर येणाऱ्या विधानसभेला २८८ जागा लढवाव्यात आणि मराठा आरक्षणासाठी सगे-सोयरेचा अध्यादेश स्वतः काढावा. अशी विनंती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी किती तीव्र आंदोलन केली आहेत. याचा फायदा समाजाला झालेला आहे. परंतु सगे सोयऱ्यावर कोणीही आता बोलायला तयार नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार सरसकट मराठा आरक्षण असेल किंवा मुस्लिम आरक्षण असेल किंवा सगे-सोयरेचा अध्यादेश असेल देवू शकत नाही हे आता स्पष्ट झालेले दिसते. कोणताही नेता कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ असे आश्वासन देत नाही. म्हणून सत्तेत जाऊनच मराठा व मुस्लीम समाजाचा प्रश्न मिटवावा लागेल जे मिळवायचे ते सत्तेत जाऊनच मिळवावे लागेल.! असा ठाम विश्वास शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी समाजमाध्यमात बोलतांना सांगितले आहे.
आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक वर्षे मत मिळवण्यासाठी चर्चिला जातो निवडणूका आल्या की सहा महिन्यांमध्ये अतिशय तीव्रतेने चर्चा होताना दिसते. एकदा सरकार स्थापन झाले की साडेचार वर्ष कोणत्याही सरकारला आरक्षणाचा मुद्दा सोडवावा वाटत नाही. त्यामुळे मागण्यापेक्षा स्वतः सरकार मध्ये सामील होऊन सगे - सोयरे चा अध्यादेश असेल किंवा मराठा, मुस्लिम आरक्षण असेल ते मिळवले सोपे जाईल. अशीही माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी दिली.
Comments
Post a Comment