राम राऊत प्रतिष्ठानचे दिव्यांगासाठी केजयेथे भव्य मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबीर
राम राऊत प्रतिष्ठानचे दिव्यांगासाठी केजयेथे भव्य मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबीर
गरजु रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा - रामहरी राऊत
केज येथे दिव्यांग बांधवासाठी राम राऊत प्रतिष्ठानचा भव्य आरोग्य मेळावा.
केज | बीड : रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानमध्ये बाळगून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये राम राऊत सामाजिक प्रतिष्ठान तर्फे केज शहरातील दिव्यांग बांधवासाठी मोफत कृत्रिम हात- पाय उपकरणे वाटप शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर दि ०३ ऑगस्ट शनिवार ते ४ ऑगस्ट रविवार सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत असणार आहे. शिबिराचे ठिकाण शिक्षक पतसंस्था हाॅल, पंचायत समिती ग्राऊंड, केज, येथे आहे. या मोफत शिबीरामध्ये प्रत्येक दिव्यांग बांधवांना राम राऊत सामाजिक प्रतिष्ठान मार्फत मोफत कृत्रिम हात-पाय उपकरणे वाटप केले जाणार आहेत. तसेच सोबत प्रतिष्ठानच्या रुग्ण सेवकांकडुन आरोग्य विषयक मार्गदर्शन ही केले जाणार आहे. या शिबीराचे आयोजक श्री. रामहरी राऊत असून ते राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख ही आहेत. ते लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे. रामहरी राऊत हे मुळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील भुमीपुत्र असून ते खुद केज तालुक्यातील असल्याने त्यांना आपल्या केज तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी नेहमी त्यांना कळवळा असतो. ते वेळोवेळी केज तालुक्यात मोफत आरोग्य शिबीरे लावुन खास आपल्या भागातील लोकांची काळजी घेत असतात. रामहरी राऊत यांचे पुढील उद्दीष्ट आहे की आपल्या केज तालुक्यात यापुढे आरोग्य समस्येमुळे एकही गरीब रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे आरोग्य बाबतीत वंचित राहु नये. तसेच प्रत्येक गरीब- गरजु रुग्ण कींवा एकही दिव्यांग बांधव खाजगी शासकीय दवाखान्याच्या अडचणी असो व बिलांच्या समस्या कुठेही तो आरोग्याच्या बाबतीत वंचित राहु नये. या करता रामहरी राऊत यांनी वेळोवेळी आपल्या केज तालुक्यात गरजु रुग्णांच्या सेवेकरता शेकडो मोफत शिबीरे आयोजित करुन त्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषधी, डोळ्यांच्या तपासणी, लहान मुलांसाठी मोफत तपासणी, वयोवृद्ध व्यक्ती महिला भगिनी करताही आरोग्य शिबीरे राबवली आहेत. सद्या केज सह बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाची संख्या जास्त असल्याने त्यांनी दिव्यांगासाठी केज शहरात दिनांक ०३ ऑगस्ट शनिवार व ०४ ऑगस्ट रविवार रोजी मोफत हात पाय उपकरणे वाटप शिबीर आयोजित केले आहे. तरी गरजु रुग्ण व दिव्यांग बांधव यांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामहरी राऊत यांनी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे आवाहन केले आहे तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आपले नाव नोंदणी खालील नंबर वर करुन घ्यावी असे सांगितले आहे.
शिबीरात नाव नोंदणी साठी संपर्क - ८९०७७७६००४ / ९११२९१८३०२
Comments
Post a Comment