बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्टला तरी मोफत शालेय गणवेश मिळणार का? दिड महिना उलटूनही विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत
बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्टला तरी मोफत शालेय गणवेश मिळणार का?? दिड महिना उलटूनही विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत:- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- राज्यसरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून "एक राज्य एट गणवेश" योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असुन समग्र शिक्षा अभियान व मोफत गणवेश वाटप योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन यामध्ये एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांतर्फे शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.तर स्काऊट या विषयास एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.मात्र शाळा सुरू होऊन दिड महिना तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने बोलघेवड्या सरकारकडून निदान १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मिळणार का?? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
निधी प्राप्त होताच मोफत गणवेश वाटप करण्यात येईल:- अमर पुरी (सहशिक्षक ( लिंबागणेश केंप्राजिपशा)
लिंबागणेश:- राज्य शासनाच्या समग्र शिक्षण अभियान व मोफत गणवेश योजने अंतर्गत शालेय विद्यार्थी -विद्यार्थींनींना मोफत गणवेश वाटप करण्यात येते.मात्र यावर्षी शासनाचे धोरण बदलल्याने गणवेशासाठी कापड खरेदी करून ते शिवण्याचे काम स्थानिक बचत गटांना देण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी आवश्यक निधी शाळेस अद्याप प्राप्त झालेला नाही.त्यामुळे मोफत गणवेश वाटपात विलंब होत आहे. निधी प्राप्त होताच गणवेशाचे वाटप करण्यात येईल असे सहशिक्षक अमर पुरी यांनी सांगितले.
लेकरं रोजच विचारतेत गणवेश कधी मिळणार?? विकत घ्यावा लागतो की काय ? :- पार्वतीबाई गायकवाड ( पालक)
दिड महिना झालं आज मिळणं उद्या मिळणं करीत दिड महिना झाला अजुन शाळेतुन मिळाला नाही.लेकरं रोजचं विचारतेत आता विकत घेऊन द्यावा का?? असा सवाल करत पालकांना खिशातुन पैसे खर्च करून गणवेश खरेदी करावा लागतो की काय अशी चिंता सतावत आहे.
Comments
Post a Comment