कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगार यांना तात्काळ न्याय द्यावा; अन्यथा आज संतप्त कामगार घेणार टोकाची भूमिका - गौतम आगळे सर


परळी (प्रतिनिधी ) मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाई राजेश कुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार सहित इतर कामगारांना किमान वेतनासह प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी - सुविधा मिळाव्यात तसेच नगरपरिषद बीड आस्थापनेतील कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे या करीता धरणे आंदोलनाचा आजचा 50 वा दिवस संपला तरी अद्याप न्याय मिळाला नाही. जिल्हाधिकारी अविनाश पाठक दिनांक ३० जूलै रोजी गैर हजर राहिल्या मुळे तीव्र निदर्शने तुर्तास स्थगित करण्यात आले.अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ३० जूलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता संतप्त सफाई कामगार तीव्र निदर्शने करून टोकाची भूमिका घेणार होते, परंतु जिल्हाधिकारी अविनाश पाठक सांयकाळी ०६ वाजेपर्यंत कार्यालयात न आल्याने तुर्तास प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले. मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून त्यात त्यांनी राज्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत मधील कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन प्रदान करणे बंधनकारक आहे. कंत्राटी कामगार ( नियम व निर्मूलन ) अधिनियम 1970 नुसार कामाच्या पद्धती व स्थिती त्यांना आरोग्य व सुखसुई मिळतात किंवा नाही आधी बाबींची तपासणी बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत यांनी करणे आवश्यक आहे. भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 अंतर्गत कंत्राटी कामगारांचे भविष्य निर्वाह निधी कायद्यातील तरतुदीचे तंतोतंत पालन झाल्याशिवाय कोणतेही बिल / देयक मंजूर करण्यात येऊ नये. किमान वेतन कायद्यातील तरतुदी व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, शासन परिपत्रक, शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. उपरोक्त प्रमाणे कारवाई होत असल्याचे सर्व मुख्याधिकारी यांनी खात्री करणे आवश्यक असून, याबाबत नियमानुसार कारवाई होत नसल्याचे आढळल्यास संबंधित मुख्याधिकारी व कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असे नमूद केले आहे.
      बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेत त्यांच्या अधिनस्थ कंत्राटदार मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई करावी किंवा कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी आजतागायत भर पावसाळ्यात आंदोलनाचा ५० वा दिवस संपला तरी सुद्धा मा. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. यावरुन त्यांची असंवेदनशीलता दर्शवते. संघटनेच्या वतीने त्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. त्याच्या प्रतिलिपी माहिती व उचित कायदेशीर कारवाई करावी या साठी संबंधित मंत्री व अधिकारी यांना ईमेल करून कंत्राटी कामगारांचा अपमान करू नये आणि सत्याच्या विरोधात असत्य आणि दमनाचा मार्ग घेऊ नये; नाही तर संत्पत कामगार आज दिनांक: ३१ जूलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या दालना समोर तीव्र निदर्शने करून टोकाची भूमिका घेतील. होणाऱ्या सर्व अनुचित प्रकारास शासन, प्रशासन, संबंधित मंत्री, अधिकारी व बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी, नगरपरिषद/ नगरपंचायत हेच जबाबदार राहतील याची कृपया गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव तथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य ( भारत सरकार मान्यताप्राप्त ) या सामाजिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी