दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक मेंहकर येथे संपन्न

दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक मेंहकर येथे संपन्न
          

संपादकांनी वृतपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही नैतिक जबाबदारी संपादक उद्धव ( माऊली ) फंगाळ

बीड (सखाराम पोहिकर ) मेहकर येथे आज बैठक घेऊन या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली प्रथम वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणे . पत्रकारांचे हितसंबंध जोपासणे . त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे . त्याचबरोबर पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे . त्यांच्या व्यावसायिक उत्पन्न वाढीसाच्या प्रश्नात लक्ष घालून ते सोडविण्याचे प्रयत्न करणे इत्यादी . अनेकविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना राज्यभर कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करून वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी संपादकांनी पुढाकार घेणे ही प्रत्येक संपादकाची नैतिक जबाबदारी आहे आसे आवाहन 27 जुलै 2024 रोजी शासकीय विश्रामगृह डोणगाव रोड मेहकर येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ सत्यजित चे संपादक उद्धव फंगाळ यांनी केले .
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संपादक तथा संघटनेचे अध्यक्ष देविदास खनपटे . संपादक सादिक कुरेशी . संपादक अन्सार भाई . संपादक अकुश राठोड . संपादक निलेश काळे . इत्यादी संपादकासह अनेक पत्रकार उपस्थित होते यावेळी संघटनेचे मेहकर येथे मुख्य कार्यालयाचे उद्धघाटन करणे प्रत्येक पेपरचा अंक छपाईसाठी संघटनेचा छापखाना सुरू करणे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची कार्यकारणी गठित करणे . यासह अनेक विषय यावेळी चर्चेला घेण्यात आले . या बैठकीत सर्व संपादकांनी आपापली मते व्यक्त केली या महत्वपुर्ण बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संपादक कैलास राऊत यांनी केले .
यावेळी संघटनेची पुढील बैठक 10 ऑगस्ट 2024 रोजी होईल आसे यावेळी जाहिर करण्यात आले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी