धानोरा रोडच्या दुरावस्थे संदर्भात नितेश उपाध्ये यांचे आमरण उपोषण
उपोषणाची दखल न घेतल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा
बीड (प्रतिनिधी) गेल्या सहा ते सात वर्षांपासून बीड शहरातील नगर रोड पासून जाणाऱ्या धानोरा रोडची अत्यंत दुरावस्था झाली आहे या धानोरा रोड परिसरात जवळपास 15 ते 20 हजार लोक वस्ती आहे तसेच या परिसरात चार शैक्षणिक संस्था असुन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारावर आहे त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते सध्या पावसाळा सुरू झाला असून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जात असताना अक्षरशा गुडघाभर पाण्यातून जावे लागते तसेच या रोडलगत असलेल्या व्यापाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे मात्र याकडे प्रशासन साप दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमवार दि. 29/7/2024 पासून नितेश उपाध्ये हे आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले असून या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
Comments
Post a Comment