कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिया डोईफोडे यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान



बीड दि.२६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या बीड जिल्हाध्यक्षा प्रिया डोईफोडे यांच्या वतीने कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील राष्ट्रवादी कार्यालय येथे दि.२१ जुलै रोजी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक डॉक्टरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट डॉक्टर म्हणून डॉ.शिशिर खोसे (त्वचारोग तज्ञ), डॉ.संदीप येवले(एम.डी.मेडिसिन)
डॉ.अर्चना धूत (स्त्रीरोग तज्ञ)
डॉ.हनुमंत पारखे (बालरोग तज्ञ) 
डॉ.महेंद्र गौशाल (एम.डी. होमिओपॅथी अँड एम.बी.ए. हेल्थ केअर) डॉ.पप्पू भिसे (पशुवैद्यकीय) या सर्व डॉक्टर आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत.
यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सारिकाताई क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण सर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष व राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्या ॲड. प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व युवती पदाधिकारी तसेच पक्षातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक,युवती उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुतार सर, प्रास्ताविक आयोजक प्रिया डोईफोडे तर आभार प्रदर्शन शालिनी परदेसी यांनी व्यक्त केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी