आरक्षण बचाव यात्रेच्या महासभेस एस्सी एसटी ओबीसीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- इंजि.विष्णु दादा देवकते
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
.गेली अनेक वर्ष सातत्याने ओबीसींच्या आरक्षणाचा लढा अँड बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत एस्सी एसटी ओबीसीचे आरक्षण कायम रहावे व मराठ्यांसाठी आरक्षणाचे वेगळे ताठ असावे हि कायम भुमिका अँड बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत गेली कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ताधारी व विरोधक ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहेत त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेला आणि अशातच महाराष्ट्र पेटवू नये म्हणून कायम सातत्याने भुमिका घेत आहेत म्हणून एस्सी एसटी ओबीसी व मराठा बांधवांमध्ये जनजागृती होण्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी एस्सी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातुन सुरू केली आहे यात्रे निमित्त अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये"ओबीसी आरक्षण बचाव"महासभेचे आयोजन गेवराई शहरात ३१जुलै रोजी सायंकाळी 4०० वाजता करण्यात आले या सभेला संघर्षयोद्धा प्रा, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, प्रदेश आध्यक्षा रेखाताई ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष किसने चव्हाण,प्रा,विष्णु जाधव,ओबीसी नेते सोमनाथ सौळुंके, अविनाश भोसीकर,आशोक हिंगे,प्रा बारस्कर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या ऐतिहासिक महासभेस गेवराई विधानसभा मतदारसंघातील एस्सी एसटी ओबीसी यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा संघर्ष याञा समितीचे स्वगताध्यक्ष ईजि.विष्णु दादा देवकते यांनी केले आहे
Comments
Post a Comment