वडवणी येथे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त ॲड.प्रकाश आंबेडकर साधणार संवाद.



आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे:-संतोष बहिरे


वडवणी /प्रतिनिधी 

 ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त दि.१ऑगस्ट २०२४गुरुवार रोजी सकाळी १०:३०वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवणी येथे येणार असून ते आरक्षण विषयी बहुजन समाजातील समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत तरी आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक समाजाचे युवा नेते संतोष भैय्या बहिरे यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे ओबीसी समाज म्हणतो कोणी आपल्यात घुसखोरी करु नये तर मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसीतुनच आरक्षण द्या या दोन्ही मुद्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक शितयुध्द पेटल्याचे वातावरण आहे. हे शितयुध्द थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे.ही यात्रा दि.१ ऑगस्ट गुरुवार रोजी वडवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहेत तरी सर्व आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक समाजाचे युवा नेते संतोष भैय्या बहिरे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी