३१ जुलै रोजी एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम विनामूल्य कार्यक्रम
३१ जुलै रोजी एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम विनामूल्य कार्यक्रम
रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक ३१ जुलै बुधवार रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात पीस बुक डेपोकडून गायक एम.एम.शेख यांनी एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी हा गीत संगीताचा कार्यक्रम मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनामूल्य आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा गायक एम.एम.शेख यांनी केले आहे.
देशातील अनेक भाषांमध्ये आपल्या सुमधुर, तालबद्ध व लयबद्ध गीतांनी अजरामर झालेले पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची येत्या ३१ जुलै रोजी पुण्यतिथी आहे. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पीस बुक डेपो कडून गायक एम.एम.शेख हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी हा कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक गायक, गायिका या कार्यक्रमात आपली गायनकला श्रोत्यांसाठी विनामूल्य सादर करतात. एम.एम.शेख न चुकता आपल्या सर्व सहकारी गायक, गायिकांच्या सोबतीने गीत संगीताचा हा रंगारंग कार्यक्रम दरवर्षी मोठ्या जोमाने सादर करीत आहेत. याला रसिक श्रोत्यांची भरभरून पसंती मिळत आहे. यंदाही ३१ जुलै बुधवार रोजी हा कार्यक्रम बीड शहरातील अहेमदनगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात संध्याकाळी ०७:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आयोजक तथा गायक एम.एम.शेख यांच्यासह आकाश जाधव, संध्या जाधव, शेख मझहरोद्दीन, अस्मिता आहिरे, मुजीब सर, निशा उजगरे, जनार्धन वडमारे, आशा भारती, ससाणे मॅडम हे गायक गायिका गीते सादर करणार आहेत. कृष्णा पांगरे साऊंड सिस्टीम सांभाळणार असून युसूफ पठाण, गौतम कांबळे, प्रताप धन्वे हे व्यवस्थापन पाहणार आहेत. या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा गायक एम.एम.शेख यांनी केले आहे.
Comments
Post a Comment