बीड न.प.कर्मचारी नलावडे यांना तात्काळ निलंबित करा - ॲड.धम्मानंद वाघमारे

  

 बीड प्रतिनिधी - बीड नगर पालीकेमधील नगर रचना कार्यालयामध्ये नलवडे नामक महिला कर्मचारी यांनी अर्वाच्च भाषेचा वापर करून अपमानित केले आहे. तरी संबंधित बीड न.प.कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. बीड नगरपालिकेमधील नगर रचना कार्यालयामध्ये कामाच्या वेळेमध्ये कर्मचारी गैरहजर होते. तसेच त्या विभागाच्या नलवडे नामक महिला कर्मारी यांना विचारणा केली असता त्यांनी "तुमचे कामे मी करत नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करा आम्ही कार्यालयात असुत किंवा नसुत तुम्ही काय आमचे मालक आहात का? तुम्ही सीओंकडे जा अथवा कलेक्टर यांच्याकडे जा आम्हाला काही फरक पडत नाही" असे बोलून त्यांनी कार्यालयाच्या बाहेर हाकलून लावले व अपमानित केले असून आपण संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा दि.३१.०७.२०१४ रोजी नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात भोंगळ कारभाराच्या विरोधात नगर पालिकेसमोर बेमुदत अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल तरी कार्यवाही करावी अशी भीम दल प्रमुख ऍड.धम्मानंद वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी