आरक्षण बचाव यात्रेच्या सभेला सर्व बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
गेवराई (प्रतिनिधी) दि. २८ महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापलेले असतांना, ओबीसी समाज म्हणतो कोणी आपल्यात घुसखोरी करु नये तर मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसीतुनच आरक्षण द्या या दोन्ही मुद्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक शितयुध्द पेटल्या सारखे आहे. पेटलेले शित युध्द थोपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दि. ३१ जुलै बुधवार रोजी गेवराई जि.बीड येथे सायंकाळी ठीक ५ वाजता येणार असून याठिकाणी सभा घेणार आहेत तरी सर्व आरक्षणधारी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचितचे विष्णु देवकते, पप्पु गायकवाड, राजु पोकळे, किशोर भोले, रेवन गायकवाड, ज्ञानेश्वर हवाले, मुबारक शेख, रामदास मोरे, सचिन कांडेकर, श्रीकृष्ण खेडकर, अनिल बोराडे तसेच भारतिय बौध्द महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन युवक आघाडी व तसेच वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत सम्यक विद्यार्थी अंदोलन, माथाडी कामगार, डॉक्टर, वकिल, शिक्षक, पेन्शनधारी असोशियशन यांच्या वतिने करण्यात आले आहे.
आरक्षण बचाव यात्रेचे ही महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काढण्यात येत आहे ते मुद्दे पुढील प्रमाणे असणार आहेत ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी व एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनासुध्दा एससी, एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तसी लागू झाली पाहिजे, एससी, एसटी आणि ओबीसीला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे, १०० ओबीसी समाजाचे आमदार निवडून आणणे, ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी या प्रमुख उद्देशासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेला ओबीसी राजकिय पक्षांनी व संघटणांनी पाठींबा देऊन स्वत: या यात्रेत शामील झाले आहेत, तसेच ओबीसी व मुस्लिम समाजासह दलित, आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहे. तरी दि. ३१ जुलै बुधवार रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता गेवराई तालुक्यातील सर्व आरक्षणधारी बहुजन समाजाने या आरक्षण बचाव यात्रेच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद वाढवुन घ्यावी असे आवाहन गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment