हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक, रंगपंचमीच्या दिवशी शेरी बु ! येथे चांदबाबा उरूस


आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : 
  रंगीबेरंगी रंगाची उधळण करत उत्सव साजरा करण्याची परंपरा पुरातन काळापासून आष्टी तालुक्यातील शेरी बु! येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या चांद शहावली बाबांचा उरूस (यात्रा) (ता.३०) सुरवात होणार आहे . हा उरुस केवळ एक यात्रा नव्हे तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असून सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे.दर्शनाचा लाभ घेण्यासह उरसाचा आनंद घेण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांची होणारी गर्दी जणू त्याची साक्ष देत असते . बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह अनेक ठिक-ठिकाणचे भाविक दर्शनास येतात, पुरातन काळापासून रंगपंचमीच्या दिवशी चांद शहावली दर्गा उरसाला प्रारंभ होत असतो . या दर्गास आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते ग्रामस्थांच्या वतीने चादर चढवली जाते दिवसभर हा उरुस सुरू असतो. दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात.दर्शन झाल्यानंतर उरसाची मुख्य आकर्षण म्हणजे गावातील सर्व धर्मीय लोक चांद शहावली बाबाना मलिदयाच्या नैवेद्य अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले जाते . गूळ व चपाती एकत्र करून मलिदा सेवन करतात . त्यासह अन्य विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात . वेगवेगळ्या रंगानी रंगून चिमुकल्याचा आनंदाला मात्र पारावार राहत नाही व फिरण्याचा आनंद घेत असतात . तर, चिमुकले खेळणी खरेदीसह झोके, रहाड पाळणा तसेच अन्य खेळणी प्रत्यक्ष खेळण्याचा आनंद घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करताना दिसून येतात . कुठल्याही जातीपातीचा भेदभाव मनात न बाळगता सर्वजण दिलखुलासपणे उरसाचा आनंद घेत आहे . त्यातून सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडत आहे . दरवर्षी मोठ्या आतुरतेने उरसाची वाट पाहत असतात दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येणारे सर्वधर्मीय बांधव असतात . त्यामुळे बाबांच्या दर्ग्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार आहार वर्ज्य आहे . फातेहा पठणासाठी सर्वधर्मीय भाविकांकडून चपाती -- गूळ एकत्र करून त्याचा मलिदा केला जातो तो येणाऱ्या जाणाऱ्या दिवसभर भाविकांना वाटला जातो . संध्याकाळी रंगी बेरंगी रंगाची उधळण करत 'डोल ताशांच्या गजरात छबिनाची मिरवणूक काढली जाते . 
  शेरी बु या गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळख असलेले पुरातन काळापासून जागृत दर्गा म्हणून सुपरिचित असलेला चांद शहावली बाबांचा उरूस साजरा केला जातो, यावेळी यात्रेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात .
श्री.संदिप खाकाळ
सरपंच शेरी बु! आष्टी .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी