उ.बा.ठा.कडुन वाजेचीं उमेदवारी जाहिर,निष्ठावंताकडुन तीव्र नाराजी ?
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ अर्जुन पा गायकर-
नाशिक लोकसभा मतदारसंघातुन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी अपेक्षित असतानां त्यांना डावलुन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने उ.बा.ठा. शिवसेना गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.कुठे स्वागत, तर कुठे विरोध उमटला आहे.
शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे एक कडवट व सच्चे शिवसैनिक म्हणुन ओळखले जातात.शिवाय ते कट्टर निष्ठावान ही आहेत.
भगुर ही त्यांची जन्मभुमी व कर्मभुमी असली तरी आपल्या आक्रमक अंदाजामुळे जिल्हाभर ते सुपरिचीत आहेत. पक्षाची त्यांनी कट्टर पणे साथ संगत केली आहे.
गत सन २०१९ चे लोकसभा निवडणुकीत ते नाशिक मतदार संघातुन उत्सुक होते.पण खासदार हेंमत गोडसे यांचेसाठी त्यांनी आपल्या उमेदवारी ला मुरड घातली होती.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकानंतर अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि शिवसेना चक्क रा.का.व कांग्रेस सोबत सत्तेत आली.या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्यां यादीत करंजकर यांचेही नाव समाविष्ट केले होते.
विजय करंजकर हे आता आमदार होणार म्हणुन जिल्हाभरात आनंद व्यक्त केला गेला.मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही नियुक्ती रोखुन धरली आणि खासदार पाठोपाठ आमदारकीचेही स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.
पुढे महाराष्ट्रात आणखीच अनपेक्षित राजकिय घडामोडी घडल्या.आणि यात शिवसेना पक्ष फुटला.सरकार ही कोसळले. ठाकरेनीं राजीनामा दिला आणि भाजप शिवसेना शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले.
या कठिण काळात अनेक आमदार , खासदार व पदाधिकारी यांनी ठाकरेचीं साथ सोडली .पण विजय करंजकर हे मात्र ठाकरे सोबतच राहिले. या निष्ठेचे फळ त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी च्या रुपाने मिळेल अशी जोरदार चर्चा होती.त्या दिशेने करंजकर यांनी मोर्चेबांधणी करत हवा ही केली होती.संपुर्ण जिल्हाभर फिरुन करंजकर यांनी झंझावाती प्रचार ही सुरु केला होता.
पण नेहमी प्रमाणेच ऐनवेळी विजय करंजकर यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे. त्या ऐवजी ही उमेदवारी सिन्नर चे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहिर झाली आहे.
राजाभाऊ वाजे यांची प्रतिमा एक जनसेवकाच्या रुपाने प्रसिद्द आहे. लोकाच्यां सुखदु:खात सातत्याने सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणुन ते सुपरिचीत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत ते आपले पारंपारीक प्रतिस्पर्धी माणिकराव कोकाटे यांचे कडुन निसटत्या मतानीं पराभुत झाले होते.
स्वच्छ व साधे अशी त्यांची प्रतिमा असुन, जिल्हाभर ते सुपरिचीत आहेत. करंजकर यांच्या आक्रमक स्वभावापेक्षा त्यांचा स्वभाव भिन्न आहे.
करंजकर यांना डावलुन वाजेचीं उमेदवारी जाहिर झाल्याने उ.बा.ठा.शिवसेना गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. करंजकर यांचेवर अन्याय झाल्याची भावना काहिजण व्यक्त करत आहेत. तर काहिजणानीं वाजेच्यां उमेदवारी चे स्वागत केले आहे.
दरम्यान नाराज झालेले विजय करंजकर नेमकी काय भुमिका घेतात या कडे आता सगळयाचें लक्ष लागले आहे.नेहमी प्रमाणेच निष्ठेला प्राधान्य देत करंजकर हे पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतात कि संयमाचा बांध फोडत आक्रमक पवित्रा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Comments
Post a Comment