मनोज जरांगे पाटील यांच्या साठी बोललेला नवस सिताराम दानवे यांनी केला पूर्ण


आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
 मौजे देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथील , सिताराम भाऊराव दानवे यांनी , मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील , दुसऱ्या टप्प्यात जे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसले होते . त्यावेळी त्यांच्या नाकातून जो रक्तस्राव चालू झाला होता , तो रक्तस्त्राव थांबण्यासाठी , देऊळगाव घाट चे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ चरणी सिताराम दानवे यांनी नवस केला होता की , त्यांच्या नाकातील रक्त थांबले तर मी ११ किलो शेरनी वाटील . त्यामुळे त्यांनी आपण बोललेला नवस ११ किलो शेरनी वाटून भैरवनाथ चरणी पूर्ण केला पूर्ण केला .
  या प्रसंगी देऊळगाव घाट चे सरपंच रामकिसन ठोंबरे , कैलास ठोंबरे , अमोल दानवे , आदेश दानवे , मनोज बर्डे , गणगे महाराज , पत्रकार आदिनाथ ठोंबरे सह आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी