पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान घाणीच्या विळख्यात; तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात; नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार; पोलिस अधिक्षकांना निवेदन
पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान घाणीच्या विळख्यात; तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात; नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार; पोलिस अधिक्षकांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- शहरातील पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच कार्यालयाभोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले असुन पोलिस अधिक्षक निवासस्थान, पोलिस अधिक्षक कार्यालय याठिकाणी नाल्या तुंबलेल्या अवस्थेत असुन कचरा साचल्याने आरोग्याचे संकट निर्माण झाले असून डेंग्यू मलेरियासह जलजन्य आजारांचा धोका असुन तातडीने नालेसफाई करण्यात यावी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी निवासस्थानासह ईतर वरिष्ठ अधिकारी यांच्या निवासस्थाने,कार्यालये तसेच बीड शहरातील ईतर ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीतील कच-याची नियमित विल्हेवाट लावण्याची उपाययोजना करण्यात यावी आणि बंद अवस्थेतील घंटागाड्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर, जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस च-हाटकर,सुदाम तांदळे यांनी केली आहे.
बीडचे नागरीक फारच सोशिक, नगरपरिषदेला पत्रव्यवहार करू :- नंदकुमार ठाकूर (पोलिस अधीक्षक बीड)
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना वरीष्ठ अधिकारी यांचे निवासस्थान तसेच कार्यालये याठिकाणी तुंबलेल्या नाल्यांची अवस्था, कचराकुंड्यांची अवस्था सांगितल्यानंतर बीडचे नागरीक फार सोशिक अशी प्रतिक्रिया देत, संबंधित निवेदनाच्या अनुषंगाने नगरपरिषदेला पत्र व्यवहार करतो म्हणाले.
तुंबलेल्या नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी, जंतुनाशक औषधांची फवारणी करावी
बीड शहरातील नागरीकांसह वरीष्ठ अधिकारी यांचे निवासस्थान तसेच कार्यालय उदा. पोलिस अधिक्षक निवासस्थान तसेच पोलिस अधिक्षक कार्यालय आदि ठिकाणी नगरपालिकेकडुन नियमित नालीसफाई होत नसल्याने बहुतांश नाल्यांमध्ये कचरा साठला आहे.त्यामुळे नाल्या तुंबल्या असुन गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे डेंग्यू मलेरियासह जलजन्य आजारांची साथ पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, जंतुनाशक औषधांची फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कचराकुंडी मधील कच-याची नियमित विल्हेवाट लावण्यात यावी
बीड शहरातील गेल्या कित्येक दिवसांपासून नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार समोर येत असुन पालिकेच्या वतीने कचरा टाकण्यासाठी शहरातील काही भागांमध्ये कचराकुंडी ठेवण्यात आल्या आहेत या कचराकुंडी मधील कचरा नियमित घेऊन जाण्याचे काम पालिकेकडून केले जात नसल्याने कचरा रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली असुन याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात यावी.
बंद घंटागाड्या सुरू कराव्यात
शहरातील काही भागांमध्ये पालिकेने घरातील कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या होत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून यख गाड्याही दिसून येत नसल्याने त्या बंद झाल्या की काय?असा प्रश्न नागरिकांना पडला असुन बंद असलेल्या घंटागाड्या तातडीने सुरू कराव्यात.
Comments
Post a Comment